मनाचे श्लोक - श्लोक ४५

प्रकाशन: संपादक मंडळ | १५ मार्च २००८

मनाचे श्लोक - श्लोक ४५ | Manache Shlok - Shlok 45

मनाचे श्लोक - श्लोक ४५ - [Manache Shlok - Shlok 45] समर्थ रामदास स्वामींनी रचलेले मनाचे श्लोक, श्लोकाचा अर्थ, संस्कृत रुपांतर आणि चित्र/Graphic/Photo/Image स्वरूपात.

मनाचे श्लोक - श्लोक ४५


जयाचेनि संगे समाधान भंगे ।
अहंता अकस्मात येऊनि लागे ॥
तये संगतीची जनीं कोण गोडी ।
जिये संगतीनें मती राम सोडी ॥४५॥समर्थ रामदास स्वामी

मनाचे श्लोक - संस्कृत रुपांतर (मनोबोधः)


समाधानभंगो भवेद्यस्य संगा ।
दहंता तथाऽऽकस्मिकी स्यात्स्वदेहे ॥
मतिर्यस्य संगात्त्जेद्रामचंद्रम् ।
तदीयेन संगेन पुंसां सुखं किम् ॥४५॥समर्थ रामदास स्वामी

मनाचे श्लोक - अर्थ


श्रीसमर्थ म्हणतात,

आपलें मूळ शोधितां ।
आपली तों माईक वार्ता ।
पुढें वस्तु च तत्वता ।
समाधान ॥

येथे समाधानाचा अर्थ समाधीशी आहे.

दृढ करुनियां बुद्धी ।
आधी घ्यावी आपशुद्धी ।
तेणें लागे समाधी ।
अकस्मात ॥

अशी समाधान वृत्ती ज्यांच्या संगतीत भंगून तिच्या ऐवजी देहबुद्धीच अंगी जडते त्या दुर्जन वितंडवाद्यांची संगती नको.

कदा वाजटाचा नको संग देवा ।
धिटाउद्धटामाजि पाषांड ठेवा ।
जेणे वृत्ति ढासळे साधकाची ।
त्यजा रे त्यजा संगती बाधकाची ।