मनाचे श्लोक - श्लोक ४४

प्रकाशन: संपादक मंडळ | १४ मार्च २००८

मनाचे श्लोक - श्लोक ४४ | Manache Shlok - Shlok 44

मनाचे श्लोक - श्लोक ४४ - [Manache Shlok - Shlok 44] समर्थ रामदास स्वामींनी रचलेले मनाचे श्लोक, श्लोकाचा अर्थ, संस्कृत रुपांतर आणि चित्र/Graphic/Photo/Image स्वरूपात.

मनाचे श्लोक - श्लोक ४४


मना सज्जना एक जीवीं धरावें ।
जनी आपुलें हीत तूवां करावें ॥
रघूनायकावीण बोलो नको हो ।
सदा मानसीं तो निजध्यास राहो ॥४३॥समर्थ रामदास स्वामी

मनाचे श्लोक - संस्कृत रुपांतर (मनोबोधः)


मनो मूढसंगे तु मौनं विधेयम् ।
कथास्वादरो रामचंद्रस्य कार्यः ॥
न रामो गृहे यत्र तत्त्याज्य सद्यः ।
सुखेनवै तेऽरण्यवासो विधेयः ॥४४॥समर्थ रामदास स्वामी

मनाचे श्लोक - अर्थ


मुखस्तंभ राहण्याने मौन धरल्यासारखे होत नाही. खरे मौन कोणते हे श्रीसमर्थांनी अजपाजप निरूपण करताना सांगितलं आहे.

येकांती मौन्य धरून बसे ।
सावध पाहातां कैसें भासे ।
सोहं सोहं ऐसे ।
शब्द होती ॥

ते शब्द सांडून बैसला ।
तो मौनी म्हणावा भला ।
योगाभ्यासाचा गलबला ।
याकारणें ॥

समर्थ सांगतात की, मौनी होता आले नाही तरी ठीक पण वायफळ भाषण वर्ज करावे. हे मना, इतर वाग्विलास सोडून देऊन, श्रीरामाचे गुणानुवादनकीर्तन कर.

कळहो करील शब्द रे ।
अनंत तो निशब्द रे ।
तुझी अनंत कां न व्हा ।
वेवादतां अव्हासव्हा ॥

राम नाही असे धाम असेल तर ते सोडून, सुख व्हावे अशी इच्छा असल्यास, अरण्यवास पत्करावा. धाम सोडून श्रीराम वनवासाला गेले तेव्हा त्यांची भेट घरी कोठून होणार ? भेटीची इच्छा असल्यास वनवासच पत्करला पाहिजे. समर्थांनाही अरण्यवास अत्यंत प्रिय होता तो उगीच नव्हे.