मनाचे श्लोक - श्लोक ४३

प्रकाशन: संपादक मंडळ | १४ मार्च २००८

मनाचे श्लोक - श्लोक ४३ | Manache Shlok - Shlok 43

मनाचे श्लोक - श्लोक ४३ - [Manache Shlok - Shlok 43] समर्थ रामदास स्वामींनी रचलेले मनाचे श्लोक, श्लोकाचा अर्थ, संस्कृत रुपांतर आणि चित्र/Graphic/Photo/Image स्वरूपात.

श्लोक ४३


मना सज्जना एक जीवीं धरावें ।
जनी आपुलें हीत तूवां करावें ॥
रघूनायकावीण बोलो नको हो ।
सदा मानसीं तो निजध्यास राहो ॥४३॥समर्थ रामदास स्वामी

संस्कृत रुपांतर


मनः सद्वचो मे त्वया ग्राह्यमेकम् ।
हितं कार्यमेवात्मनः सर्वथेति ॥
कदाप्यन्यशब्दं न रामाद्वदिष्ये ।
नदिध्यासमेनंय दृढं पालयांऽग ॥४३॥समर्थ रामदास स्वामी

अर्थ


श्रीसमर्थ या श्लोकात मनाला बजावत आहेत की, या जगात जन्माला येऊन परमार्थ प्राप्त करून घ्यायचा आहे. याचा कधीही विसर पडू देऊ नको. याविषयी प्रत्येक क्षणी जागृक रहा. तरच आणि तरच मनुष्य जन्माचे सार्थक झाले, असे म्हणता येईल.

कांही च न करूनि प्राणी ।
रामनाम जपे वाणी ।
तेणें संतुष्ट चक्रपाणी ।
भक्तांलागी सांभाळी ॥

श्रीराम नामस्मरणावाचून हे मना, जिव्हेला व्यर्थ शिणवू नकोस. बोलायचेच असेल तर रामनामाचा जप कर, नाही पेक्षा, मना रे जनीं मौन्यमुद्रा धरावी ॥

साक्षात्कार होण्यापूर्वी श्रवण-मनन, निदिध्यास ह्या एकाहून एक वरचढ पायऱ्या चढाव्या लागतात.

श्रवणापरीस मनन सार ।
मननें कळे सारासार ।
निजध्यासें साक्षात्कार ।
निसंग वस्तु ॥