मनाचे श्लोक - श्लोक ४२

प्रकाशन: संपादक मंडळ | १३ मार्च २००८

मनाचे श्लोक - श्लोक ४२ | Manache Shlok - Shlok 42

मनाचे श्लोक - श्लोक ४२ - [Manache Shlok - Shlok 42] समर्थ रामदास स्वामींनी रचलेले मनाचे श्लोक, श्लोकाचा अर्थ, संस्कृत रुपांतर आणि चित्र/Graphic/Photo/Image स्वरूपात.

मनाचे श्लोक - श्लोक ४२


बहुतांपरी हेंचि आतां धरावें ।
रघूनायका आपुलेसे करावें ॥
दिनानाथ हें तोडरीं ब्रीद गाजे ।
मना सज्जना राघवीं वस्ति कीजे ॥४२॥समर्थ रामदास स्वामी

मनाचे श्लोक - संस्कृत रुपांतर (मनोबोधः)


यदा दीननाथत्वमंगीकृतं तै ।
स्तदा राम मां त्वं स्वकीयं कुरुष्व ॥
मनो वाच्यमेतत्त्वया नित्यमेव ।
कुरु त्वं तु रामे निवासं सदैव ॥४२॥समर्थ रामदास स्वामी

मनाचे श्लोक - अर्थ


श्रीसमर्थ मनाला समजवत आहेत की, हे मना, आता फार काय सांगू, एकच गोष्ट सांगतो. हवं ते कर, पण श्रीरामाला प्रथम आपलासा करून घे आणि मग इतर सर्व व्याप करत बस. हे सांगण्याचेही एक कारण आहे. दीन जनांचे रक्षण करणे हा श्रीरामाचा बाणाच आहे.

देव अनाथांचा कैपक्षी ।
नाना संकटांपासून रक्षी ।
धांविन्नला अंतरसाक्षी ।
गजेंद्राकारणें ॥

पदी राघवाचे सदा ब्रीद गाजे ॥ (श्लोक २९ पहा)

श्लोक ३८ ते ४२ अशा पाच श्लोकांचे हे सवेल आहे. ३८ व्या श्लोकात श्रीरामाचे ध्यान करायला सांगितले, ३९ मध्ये चित्त एकग्र करायला सांगितले, ४० मध्ये श्रीचरणी सारखे लक्ष ठेवून कल्पनाक्षय किंवा मनोजय करण्यास सांगितले, ४१ मध्ये अव्यभिचारिणी भक्तीच्या द्वारे विचाराने मनोबोध करण्यास सांगून, या श्लोकात शेवटी समर्थ इत्यर्थ सांगत आहेत की, श्रीरामाला कसे ही करून आपलासा करून घे.