मनाचे श्लोक - श्लोक ४०

प्रकाशन: संपादक मंडळ | ११ मार्च २००८

मनाचे श्लोक - श्लोक ४० | Manache Shlok - Shlok 40

मनाचे श्लोक - श्लोक ४० - [Manache Shlok - Shlok 40] समर्थ रामदास स्वामींनी रचलेले मनाचे श्लोक, श्लोकाचा अर्थ, संस्कृत रुपांतर आणि चित्र/Graphic/Photo/Image स्वरूपात.

मनाचे श्लोक - श्लोक ४०


मना पाविजे सर्वही सूख जेथे ।
अति आदरें ठेविजे लक्ष तेथें ॥
विविकें कुडी कल्पना पालटिजे ।
मना सज्जना राघवी वस्ति कीजे ॥४०॥समर्थ रामदास स्वामी

मनाचे श्लोक - संस्कृत रुपांतर (मनोबोधः)


मन: प्राप्तयते वै सुखं यंत्र सर्व ।
मिति प्रीतियोगेन तल्लक्षितव्यम्‌ ॥
विवेकेन दुर्वासनां संप्रमुच्य ।
सदा रामचंद्रे निवासं कुरुष्व ॥४०॥समर्थ रामदास स्वामी

मनाचे श्लोक - अर्थ


श्रीसमर्थ या श्लोकातून आपल्याला सांगत आहेत की -

जयास वाटे सुख चि असावें ।
तेणें रघुनाथभजनीं लागावें ।
स्वजन सकळ ही त्यागावें ।
दुःखमूळ जे ॥

कुडी कल्पना म्हणजे - वाईट, दुष्ट, मिथ्या, शबल, अशुद्ध कल्पना.

उंच उठणे किंवा पतन होणे, हे केवळ कल्पनेचेच कार्य. त्यामुळे तिचं निर्मुलन केल्याशिवाय ब्रह्मप्राप्ती अशक्यच. शुद्ध कल्पनेने अशुद्ध कल्पना छाटून टाकावी आणि मग जी शुद्ध कल्पना उरते ती, स्वरूपाचे चिंतन करता करता तद्रूप होऊन जाते.

कल्पनेचें येक बरें ।
मोहरितांच च मोहरे ।
स्वरूपी घालितां भरे ।
निर्विकल्पी ॥

निर्विकल्पासी कल्पितां ।
कल्पनेची नुरे वार्ता ।
निःसंगास भेटों जातां ।
निःसंग होइजे ॥