मनाचे श्लोक - श्लोक ४

प्रकाशन: संपादक मंडळ | ४ फेब्रुवारी २००८

मनाचे श्लोक - श्लोक ४ | Manache Shlok - Shlok 4

मनाचे श्लोक - श्लोक ४ - [Manache Shlok - Shlok 4] समर्थ रामदास स्वामींनी रचलेले मनाचे श्लोक, श्लोकाचा अर्थ, संस्कृत रुपांतर आणि चित्र/Graphic/Photo/Image स्वरूपात.

मनाचे श्लोक - श्लोक ४


मना वासना दुष्ट कामा न ये रे ।
मना सर्वथा पापबुद्धी नको रे ॥
मना सर्वथा नीति सोडूं नको हो ।
मना अंतरीं सार वीचार राहो ॥४॥समर्थ रामदास स्वामी

मनाचे श्लोक - संस्कृत रुपांतर (मनोबोधः)


मनो वासनां दु:खदां संत्यजाशु ।
मन: सर्वदा पापबुद्धि जहीहि ॥
मनो मा त्यजाsज्ञानतो धर्ममागम्‌ ।
मनस्तिष्ठ सत्सारभूते विचारे ॥४॥समर्थ रामदास स्वामी

मनाचे श्लोक - अर्थ


श्रीसमर्थ मनाला उपदेश करत आहेत की वासना कुठलीही असो, ती दुष्टच असते. वासना आपल्याला सुरुवातीला सुखाची आशा दाखवते पण अंती दुःखच भोगायला लावते. त्यामुळे ती कुठल्याही कामाची नाही. म्हणून समर्थ मनाला वासनेपासून सावध रहायला सांगत आहेत.

पाप म्हणजे कूकर्म. कूकर्म हे नेहमी माणसाच्या अधःपतनाला कारणीभूत ठरते. म्हणून समर्थ मनाला ती मूळ पापबुद्धीच नष्ट करायाला सांगत आहेत.

इथे समर्थांना एरवीचे धर्म अभिप्रेत नसून ‘धर्माचरण’ म्हणजे योग्य कर्मांचे आचरण म्हणजेच नीतिचे आचरण अपेक्षित आहे. शुद्ध आचरणाने मनातील सत्त्व वाढीस लागून भक्तिला ती सहाय्यभूत ठरते.

समर्थ मनाला उपदेश करत आहेत की अंतरमनात सदैव विवेक बुद्धीची ज्योत जागृत ठेवून जीवन जगले पाहिजे. कारण परमार्थात प्रगती करण्यासाठी आणि प्रपंच नीट चालण्यासाठी विवेकाचीच गरज लागते.