Download MarathiMati.com's New Android App from Google Play

मनाचे श्लोक - श्लोक ३७

प्रकाशन: संपादक मंडळ | ८ मार्च २००८

मनाचे श्लोक - श्लोक ३७ | Manache Shlok - Shlok 37

मनाचे श्लोक - श्लोक ३७ - [Manache Shlok - Shlok 37] समर्थ रामदास स्वामींनी रचलेले मनाचे श्लोक, श्लोकाचा अर्थ, संस्कृत रुपांतर आणि चित्र/Graphic/Photo/Image स्वरूपात.

मनाचे श्लोक - श्लोक ३७


सदा चक्रवाकासि मार्तंड जैसा ।
उडी घालितो संकटी स्वामि तैसा ॥
हरीभक्तिचा घाव गाजे निशाणी ।
नुपेक्षी कदा राम दासाभिमानी ॥३७॥समर्थ रामदास स्वामी

मनाचे श्लोक - संस्कृत रुपांतर (मनोबोधः)


हरि: प्रणिनां सनिधौ सर्वदाऽऽस्ते ।
कृपालु: स्वभक्तस्य धैंर्य विलोक्य ॥
सदानंदरुपेन कैवल्यदो य: ।
स नोपेक्षते रामचंद्र: स्वभक्तम्‌ ॥३५॥समर्थ रामदास स्वामी

मनाचे श्लोक - अर्थ


मार्तंड म्हणजे सूर्य. श्रीसमर्थ यासंबंधी चक्रवाक पक्षाची एक कथा सांगतात -

चक्रवाक पक्षाची कथा अशी आहे की, हा पक्षी बहुधा एकटा नसतो. नर आणि मादी बरोबर असतात. योग असा येतो की, एखाद्या विस्तृत नदीच्या दुसऱ्या तीरावर नर गेलेला असतो व मादी अलिकडच्या तीरावरच असता सूर्य मावळतो. मग इकडून मादीने ओरडायचे व तिकडून नराने ओरडायचे. अशा रीतीने सारी रात्र ते नरमादी विरहात कंठीत असतात. प्रातःकाळी सूर्य उदयास येऊन त्यांच्या विरहदुःखाचे जसे हरण करतो, अगदी त्याच प्रमाणे भक्त संकटात आहे हे समजताच श्रीसद्गुरू/श्रीभगवंत भक्ताला त्या संकटातून सोडवण्यासाठी धावून येतात.

निस्साण म्हणून नगाऱ्यासारखे एक वाद्य आहे. तसा अर्थ घेतला तर ‘नगाऱ्यावर हरिभक्तीचे टिपरू सारखे वाजत आहे’ असा या चरणाचा अर्थ होईल. पण निशाण या शब्दाचा तसा काही अर्थ येथे नसला तर ‘हरिभक्तीचे निशाण प्रगट रीतीने सारखे फडकत आहे’ असा अर्थ करावा.

प्रगट रामाचें निशाण ।
आत्माराम ज्ञानधन विश्वंभर विद्यमान ।
भाग्यें कळे ॥

कदा काळीं राम दासां उपेक्षीना ।
रामउपासना ऐसी आहे ॥

या ओवी प्रमाणे श्रीराम भक्ताची कधीही उपेक्षा करत नाही, हे सत्य समर्थ आपल्याला येथे सांगत आहेत.

Download MarathiMati.com's New Android App from Google Play