मनाचे श्लोक - श्लोक ३४

प्रकाशन: संपादक मंडळ | ५ मार्च २००८

मनाचे श्लोक - श्लोक ३४ | Manache Shlok - Shlok 34

मनाचे श्लोक - श्लोक ३४ - [Manache Shlok - Shlok 34] समर्थ रामदास स्वामींनी रचलेले मनाचे श्लोक, श्लोकाचा अर्थ, संस्कृत रुपांतर आणि चित्र/Graphic/Photo/Image स्वरूपात.

मनाचे श्लोक - श्लोक ३४


उपेक्षी कदा रामरुपी असेना ।
जिवां मानवां निश्चयो तो वसेना ॥
शिरी भार वाहेन बोले पुराणीं ।
नुपेक्षी कदा राम दासाभिमानी ॥३४॥समर्थ रामदास स्वामी

मनाचे श्लोक - संस्कृत रुपांतर (मनोबोधः)


उपेक्षा न कस्यापि यरय स्वरुपे ।
इति प्रत्ययो नास्ति मूढस्य चित्ते ॥
पुराणानि यं विश्र्वपालं वदंति ।
स नोपेक्षते रामचंद्र: स्वभक्तम्‌ ॥३४॥समर्थ रामदास स्वामी

मनाचे श्लोक - अर्थ


श्रीसमर्थ या श्लोकात सांगत आहेत की, श्रीरामाची कधीही उपेक्षा करु नये.

देवावेगळें कोणी नाहीं ।
ऐसें बोलती सर्वही ।
परंतु त्यांची निष्ठा कांही ।
तैसीच च नसे ॥

वास्तविक पाहता श्रीरामाने भक्ताची कधीही उपेक्षा केलेली नाही पण मनाचा तसा निश्चयच होत नाही, याला काय करावे !

पुराणे देखील याची साक्ष देतात की श्रीरामाचे (श्रीहरीचे) अखंड चिंतन केल्यास तो भक्ताला पूर्णपणे सांभाळतो.

दयाळूपणें देव राजाधिराजें ।
शिरी वाहिजें सर्व ही भक्तवोझें ।
जनीं दास देखोनियां दैन्य वाणा ।
मनामाजि वोसावतो देवराणा ॥