Download MarathiMati.com's New Android App from Google Play

मनाचे श्लोक - श्लोक ३२

प्रकाशन: संपादक मंडळ | ३ मार्च २००८

मनाचे श्लोक - श्लोक ३२ | Manache Shlok - Shlok 32

मनाचे श्लोक - श्लोक ३२ - [Manache Shlok - Shlok 32] समर्थ रामदास स्वामींनी रचलेले मनाचे श्लोक, श्लोकाचा अर्थ, संस्कृत रुपांतर आणि चित्र/Graphic/Photo/Image स्वरूपात.

मनाचे श्लोक - श्लोक ३२


अहल्या शिळा राघवें मुक्त केली ।
पदीं लागतां दिव्य होऊनि गेली ॥
जया वर्णितां शीणली वेदवाणी ।
नुपेक्षी कदा राम दासाभिमानी ॥३२॥समर्थ रामदास स्वामी

मनाचे श्लोक - संस्कृत रुपांतर (मनोबोधः)


अहल्या शि लीभूतदेहाऽपि येन ।
कृता पादसंस्पर्शतोऽतीव पूता ॥
श्रुतिर्यद्यशोवर्णने मौनमाप ।
स नोपेक्षते रामचंद्र: स्वभक्तम्‌ ॥३२॥समर्थ रामदास स्वामी

मनाचे श्लोक - अर्थ


गौतममुनींनी त्यांची पत्नी अहल्या हिला घडलेल्या अपराधाबद्दल शाप दिल्यामुळे ती हजारों वर्षे शिळा होऊन तशीच पडली होती. त्यानंतर जेव्हा भगवान श्रीविष्णूंनी रामावतार धारण केला तेव्हा तिच्या उद्धाराची वेळ जवळ आली. विश्वामित्रऋषी यांच्याकडे शिक्षा घेताना एक दिवस राम आणि लक्ष्मण त्यांच्यासोबत मिथिलानगरीस जात होते. मार्गात गौतममुनींचा रिकामा आश्रम त्या सर्वांच्या नजरेस आला. या आश्रमाबाबत राम-लक्ष्मण यांनी विश्वामित्रांकडे चौकशी केली असता त्यांना सर्व हकिकत सांगण्यात आली. हे सांगून विश्वामित्र राम-लक्ष्मणांना घेऊन आश्रमाकडे गेले आणि श्रीरामाच्या अगदी सहज पादस्पर्शाने त्या शिळेची पूर्ववत अहल्या झाली.

म्हणूनच श्रीसमर्थ आपल्याला बोध करुन देत आहेत की जिथे श्रीरामाच्या कृपेने जर शिळा उद्धरु शकते, तर मनुष्याचा उद्धार का नाही होणार ? यात मुळी शंका नाहीच !

रामपाईं शिळा जाली दिव्य बाळा ।
तैसाची सोहळा मानवांसी ॥.

Download MarathiMati.com's New Android App from Google Play