मनाचे श्लोक - श्लोक ३१

प्रकाशन: संपादक मंडळ | २ मार्च २००८

मनाचे श्लोक - श्लोक ३१ | Manache Shlok - Shlok 31

मनाचे श्लोक - श्लोक ३१ - [Manache Shlok - Shlok 31] समर्थ रामदास स्वामींनी रचलेले मनाचे श्लोक, श्लोकाचा अर्थ, संस्कृत रुपांतर आणि चित्र/Graphic/Photo/Image स्वरूपात.

मनाचे श्लोक - श्लोक ३१


महासंकटी सोडिले देव जेणें ।
प्रतापे बळे आगळा सर्वगूणे ॥
जयाते स्मरे शैलजा शूलपाणी ।
नुपेक्षी कदा राम दासाभिमानी ॥३१॥समर्थ रामदास स्वामी

मनाचे श्लोक - संस्कृत रुपांतर (मनोबोधः)


महत्संकटान्मोचिया येन देवा ।
बलेन प्रतापैर्गुगैर्यो वरिष्ठ: ॥
स्मरत्यंबिका शूल पाणि: सदा यम्‌ ।
स नोपेक्षते रामचंद्र: स्वभक्तम्‌ ॥३१॥समर्थ रामदास स्वामी

मनाचे श्लोक - अर्थ


यासंबंधी श्रीसमर्थांची एक कविता आहे. ती अशी -
समीर लोटितो खडे ।
वरुण घालितो सडे ।
मयंक साउली धरी ।
मळीण पावकु हरी ॥
विधी विधीस धाकतो ।
सुरेंद्र बाग राखतो ।
करावयास निग्रहो ।
भुमंडळासि विग्रहो ॥
अखंड चाकरी करी ।
सदा वरुची भादरी ।
सटी आरंधळी दळी ।
गणेश गाढवें वळी ॥
बहु कठीण काळ हो ।
समस्त पावले मोहो ।
हिना-दिनाचिया परी ।
सदा गळीत अंतरी ॥
समस्त केंश लांबले ।
कितेक वेस्त लोंबले ।
नखें चि योग साधले ।
समस्त देव गादले ॥
अशा त्रस्त स्थितीतून महा पराक्रमी व विशेष गुण संपन्न श्रीरामाने देवांना रावणाच्या कैद मधून सोडवले.

शैल्यजा म्हणजे माता पार्वती आणि शूळपाणी म्हणजे भगवान श्रीशंकर. माता पार्वती आणि भगवान शंकर अत्यंत आदरपूर्वक व प्रेमाने श्रीरामाचे स्मरण करतात.