मनाचे श्लोक - श्लोक ३०

प्रकाशन: संपादक मंडळ | १ मार्च २००८

मनाचे श्लोक - श्लोक ३० | Manache Shlok - Shlok 30

मनाचे श्लोक - श्लोक ३० - [Manache Shlok - Shlok 30] समर्थ रामदास स्वामींनी रचलेले मनाचे श्लोक, श्लोकाचा अर्थ, संस्कृत रुपांतर आणि चित्र/Graphic/Photo/Image स्वरूपात.

मनाचे श्लोक - श्लोक ३०


समर्थाचिया सेवका वक्र पाहे ।
असा सर्व भुमंडळी कोण आहे ॥
जयाची लिला वर्णिती लोक तीन्ही ।
नुपेक्षी कदा राम दासाभिमानी ॥३०॥समर्थ रामदास स्वामी

मनाचे श्लोक - संस्कृत रुपांतर (मनोबोधः)


प्रभो: सेवकं लोकयेत्क्रूरद्दष्ट्या ।
स ईद्दग्विध: कोऽस्ति भूम्यामबुद्धि: ॥
त्रिलोक्यां जना यद्यशो वर्णयंति ।
स नोपेक्षते रामचंद्र: स्वभक्तम्‌ ॥३०॥समर्थ रामदास स्वामी

मनाचे श्लोक - अर्थ


श्रीसमर्थ येथे सांगतात की श्रीरामाचे दास्यत्व एकदा स्वीकारले असता त्याच्याकडे वाकड्या नजरेने पाहण्याची या त्रिभुवनात कोणाचीही प्राज्ञा नाही ! परंतु उलट -
समर्थांची नाहीं पाठी ।
तयास भलता च कुटी ।
या कारणें उठाउठी ।
भजन करावें ॥

भगवान श्रीशंकरांनी शतकोटी रामायण तिन्ही लोकात वाटून दिल्यामुळे रामाच्या लीलेचे वर्णन तिन्ही लोकात आहे.

श्रीरामाचें चरित्र सांगतां अपार ।
जाहाला विस्तार तींहीं लोकीं ।
तींहीं लोकीं हरें वांटूनी दिधलें ।
तें आम्हा लाधलें कांही येक ॥