Download MarathiMati.com's New Android App from Google Play

मनाचे श्लोक - श्लोक ३

प्रकाशन: संपादक मंडळ | ३ फेब्रुवारी २००८

मनाचे श्लोक - श्लोक ३ | Manache Shlok - Shlok 3

मनाचे श्लोक - श्लोक ३ - [Manache Shlok - Shlok 3] समर्थ रामदास स्वामींनी रचलेले मनाचे श्लोक, श्लोकाचा अर्थ, संस्कृत रुपांतर आणि चित्र/Graphic/Photo/Image स्वरूपात.

मनाचे श्लोक - श्लोक ३


प्रभाते मनी राम चिंतीत जावा ।
पुढे वैखरी राम आधी वदावा ॥
सदाचार हा थोर सांडूं नये तो ।
जनीं तोचि तो मानवी धन्य होतो ॥३॥समर्थ रामदास स्वामी

मनाचे श्लोक - संस्कृत रुपांतर (मनोबोधः)


प्रभाते तु यश्र्विंतयेद्रामचंद्रम्‌ ।
तत: कीर्तयेत्तहुणांश्र्चारुवाचा ॥
सदाचारमेनं त्यजेन्नैकचित्तो ।
जगत्यां स एवातिधन्यत्वमेति ॥३॥समर्थ रामदास स्वामी

मनाचे श्लोक - अर्थ


प्रभातकाळी सर्वा वृत्ती साहजिकपणे शांत असतात, त्यामुळे चित्ताची एकाग्रता होण्याला प्रातःकाळ उत्तम. म्हणून प्रभातकाळी एकाग्रचित्ताने श्रीरामाचे चिंतन करावे.
प्रात्ःकाळी उठावें ।
काहीं पाठांतर करावें ।
येथानशक्ति आठवावें ।
सर्वोत्तमासी ॥

पुढे म्हणजे चिंतन झाल्यावर, आधी म्हणजे इतर व्यवहार करण्यापूर्वी, वैखरी म्हणजे वाणीने, राम वदावा म्हणजे श्रीरामाचे भजन करावे. कोणी असा अर्थ लावतात तर कोणी, कोणतंही भाषण करण्यापूर्वी प्रथम रामनामस्मरण करावे, असाही अर्थ काहींना येथे अभिप्रेत आहे.

‘मानवीं धन्य होतो’ म्हणजे वर सांगितल्या प्रमाणे जो सदैव श्रीरामाच्या चिंतनात राहून शेवटी त्याच्यातच कायमचा लीन होईल, तो मनुष्य संसाराचा भव सागर तरुन खरोखरीच धन्य म्हणजे तृप्त होईल.

Download MarathiMati.com's New Android App from Google Play