मनाचे श्लोक - श्लोक २९

प्रकाशन: संपादक मंडळ | २९ फेब्रुवारी २००८

मनाचे श्लोक - श्लोक २९ | Manache Shlok - Shlok 29

मनाचे श्लोक - श्लोक २९ - [Manache Shlok - Shlok 29] समर्थ रामदास स्वामींनी रचलेले मनाचे श्लोक, श्लोकाचा अर्थ, संस्कृत रुपांतर आणि चित्र/Graphic/Photo/Image स्वरूपात.

मनाचे श्लोक - श्लोक २९


पदी राघवाचे सदा ब्रीद गाजे ।
वळें भक्तरीपूशिरी कांबि वाजे ॥
पुरी वाहिली सर्व जेणे विमानीं ।
नुपेक्षी कदा रामदासाभिमानी ॥२९॥समर्थ रामदास स्वामी

मनाचे श्लोक - संस्कृत रुपांतर (मनोबोधः)


व्रतं रामचंद्रस्य तु ख्यातमेतत्‌ ।
स्वभक्तद्विषो मस्तकं ताड्यामेव ॥
पुरी येन नीता क्षणाद्देवलोकम्‌ ।
स नोपेक्षते रामचंद्र: स्वभक्तम्‌ ॥२९॥समर्थ रामदास स्वामी

मनाचे श्लोक - अर्थ


श्रीसमर्थ सांगतात की, श्रीरामाच्या पायात तोडर असून, त्यांचा रुमझुम आवाज होत असतो. भक्तांचे रक्षण करण्याचे श्रीरामाचे ब्रीद तो आवाज दाखवतो.

ब्रिदावळी पदीं वसे ।
विशेष दूसरा नसे ।
विबुधबंद सोडिले ।
अनंत जीव सोडिले ॥

कांबि म्हणजे धनुष्यदंड. श्रीरामभक्ताच्या शत्रूंच्या मस्तकी त्या धनुष्याच्या कांबीचा टणत्कार जोराने होतो. ज्या श्रीरामाने सर्व अयोध्यापुरी आपल्या बरोबर विमानात नेली, तो भक्तकैवारी श्रीराम अनन्य भक्ताची कधीही उपेक्षा करत नाही.