मनाचे श्लोक - श्लोक २८

प्रकाशन: संपादक मंडळ | २८ फेब्रुवारी २००८

मनाचे श्लोक - श्लोक २८ | Manache Shlok - Shlok 28

मनाचे श्लोक - श्लोक २८ - [Manache Shlok - Shlok 28] समर्थ रामदास स्वामींनी रचलेले मनाचे श्लोक, श्लोकाचा अर्थ, संस्कृत रुपांतर आणि चित्र/Graphic/Photo/Image स्वरूपात.

मनाचे श्लोक - श्लोक २८


दिनानाथ हा राम कोदंडधारी ।
पुढें देखतां काळ पोटीं थरारी ॥
मना वाक्य नेमस्त हे सत्य मानीं ।
नुपेक्षी कदा राम दासाभिमानी ॥२८॥

मनाचे श्लोक - संस्कृत रुपांतर (मनोबोधः)


मनो दीननाथं प्रभुं चाचपाणिम्‌ ।
विलोक्याग्रत: कंपते काल एष ॥
जनैर्मद्वच: सत्यमेवेति मान्यम्‌ ।
जहात्येव नो रामचंद्र: सव्भक्तम्‌ ॥२८॥समर्थ रामदास स्वामी

मनाचे श्लोक - अर्थ


श्रीसमर्थ येथे सांगत आहेत की, श्रीराम धनुष्य धारण करणारा असून तो भक्तवत्सल आहे. अशा धनुर्धारी श्रीरामाला प्रत्यक्ष यम देखील घाबरतात. जनांनी या गोष्टीस सत्य मानावे.

समर्थ या तत्त्वाचा बोध काही ओव्यांमधून व्यक्त करतात -
देव भक्तांचा कैवारी ।
देव पतितांसी तारी ।
देव होय साहाकारी ।
अनाथांचा ॥

देव अनाथाचा कैपक्षी ।
नाना संकटांपासून रक्षी ।
धांविन्नला अंतरसाक्षी ।
गजेंद्राकारणें ॥

देव कृपेचा सागरु ।
देव करुणेचा जळधरु ।
देवासी भक्तांचा विसरु ।
पडणार नाही ॥