मनाचे श्लोक - श्लोक २७

प्रकाशन: संपादक मंडळ | २७ फेब्रुवारी २००८

मनाचे श्लोक - श्लोक २७ | Manache Shlok - Shlok 27

मनाचे श्लोक - श्लोक २७ - [Manache Shlok - Shlok 27] समर्थ रामदास स्वामींनी रचलेले मनाचे श्लोक, श्लोकाचा अर्थ, संस्कृत रुपांतर आणि चित्र/Graphic/Photo/Image स्वरूपात.

मनाचे श्लोक - श्लोक २७


भवाच्या भये काय भीतोस लंडी ।
धरीं रे मना धीर धाकासि सांडी ॥
रघूनायकासारिखा स्वामि शीरीं ।
नुपेक्षी कदा कोपल्या दंडधारी ॥२७॥समर्थ रामदास स्वामी

मनाचे श्लोक - संस्कृत रुपांतर (मनोबोधः)


भवस्यास्य भीता मन: किं बिभेषि ।
जहीमां धियं धैर्यमेवावलंब्य ॥
प्रभौ रक्षके रामचंद्रे शिरस्थे ।
भयं किन्नु ते दंडहस्तात्कृतांतात्‌ ॥२७॥समर्थ रामदास स्वामी

मनाचे श्लोक - अर्थ


या श्लोकात श्रीसमर्थ म्हणतात की, या प्रपंचातून येणाऱ्या अडी-अडचणींना, संकटांना घाबरतोस कशाला ? लंडी म्हणजे भित्रा. धीर धरुन या भीतीला सांडून दे. कारण भीतीचा त्याग झाल्यावरच माणूस स्वतंत्रपणे, मोकळेपणाने जगू शकतो. आणि त्यातही श्रीरामासारखा पाठीराखा असताना कशाची भीती आणि कशाची चिंता ? हे समजवण्यासाठी समर्थ म्हणतात -
रघूनायकासारिखा स्वामि दाता ।
असोनी शिरीं वाहसी वेर्थ चिंता ।
नको वीसरों राघवा भूजकांता ।
नुपेक्षी नुपेक्षी कदा तूज भ्रांता ॥