मनाचे श्लोक - श्लोक २३

प्रकाशन: संपादक मंडळ | २३ फेब्रुवारी २००८

मनाचे श्लोक - श्लोक २३ | Manache Shlok - Shlok 23

मनाचे श्लोक - श्लोक २३ - [Manache Shlok - Shlok 23] समर्थ रामदास स्वामींनी रचलेले मनाचे श्लोक, श्लोकाचा अर्थ, संस्कृत रुपांतर आणि चित्र/Graphic/Photo/Image स्वरूपात.

श्लोक २३


न बोलें मना राघवेवीण कांहीं ।
जनी वाउगें बोलता सुख नाहीं ॥
घडिने घडी काळ आयुष्य नेतो ।
देहांतीं तुला कोण सोडूं पहातो? ॥२३॥समर्थ रामदास स्वामी

संस्कृत रुपांतर


मनो रामनाम्नस्त्वयाऽन्यन्न वाच्यम्‌ ।
वृथावाक्प्रबंधात्सुखं नैति कश्र्चित्‌ ॥
क्षणैनाऽऽयुरग्रे हरत्वेय काल: ।
शरीरावसानेऽथ को मोचयेत्त्वाम्‌ ॥२३॥समर्थ रामदास स्वामी

अर्थ


श्रीसमर्थ इथे उपदेश करतात की, वाचेत नेहमी सत्य असावे. असत्य किंवा वायफळ बडबडीने स्वतःचे केवळ अहितच होते.

प्रत्येक क्षणी काळ माणसाला ग्रासत आहे. क्षणा-क्षणाने आयुष्य कमी होत आहे. देहाचा अंत जवळ आल्यावर आपण काय करु शकणार आहोत ?
संसार म्हणिजे सवें च स्वार ।
नाहीं मरणास उधार ।
मापीं लागलें शरीर ।
घडीने घडी ॥