मनाचे श्लोक - श्लोक २२

प्रकाशन: संपादक मंडळ | २२ फेब्रुवारी २००८

मनाचे श्लोक - श्लोक २२ | Manache Shlok - Shlok 22

मनाचे श्लोक - श्लोक २२ - [Manache Shlok - Shlok 22] समर्थ रामदास स्वामींनी रचलेले मनाचे श्लोक, श्लोकाचा अर्थ, संस्कृत रुपांतर आणि चित्र/Graphic/Photo/Image स्वरूपात.

मनाचे श्लोक - श्लोक २२


मना सज्जना हीत माझें करावें ।
रघुनायका दृढ चित्ती धरावें ॥
महाराज तो स्वामि वायुसुताचा ।
जना उद्धरी नाथ लोकत्रयाचा ॥२२॥समर्थ रामदास स्वामी

मनाचे श्लोक - संस्कृत रुपांतर (मनोबोधः)


मनो मे हितं कार्यमेतत्त्वयाऽद्य ।
सदा तस्य पादौ प्रयत्नेन सेव्यौ ॥
प्रभुर्वायुपुत्रस्य य: ख्यातकीर्ति ।
स्त्रिलोकाधिनो महाराज एक: ॥२२॥समर्थ रामदास स्वामी

मनाचे श्लोक - अर्थ


श्रीसमर्थ मनाला सांगत आहेत की, श्रीरामाचे अखंड स्मरण ठेवून त्याने स्वतःचे हित साधून घ्यावे. श्रीरामाला चित्तात दृढ ठेवावे. तो वायूसुताचा म्हणजेच हनुमंताचा स्वामी असून जनांचा उद्धार करुन त्रैलोक्याला मुक्ती देणारा आहे.