मनाचे श्लोक - श्लोक २१

प्रकाशन: संपादक मंडळ | २१ फेब्रुवारी २००८

मनाचे श्लोक - श्लोक २१ | Manache Shlok - Shlok 21

मनाचे श्लोक - श्लोक २१ - [Manache Shlok - Shlok 21] समर्थ रामदास स्वामींनी रचलेले मनाचे श्लोक, श्लोकाचा अर्थ, संस्कृत रुपांतर आणि चित्र/Graphic/Photo/Image स्वरूपात.

मनाचे श्लोक - श्लोक २१


मना वासना चूकवीं येरझारा ।
मना कामना सांडी रे द्रव्यदारा ॥
मना यातना थोर हे गर्भवासीं ।
मना सज्जना भेटवीं राघवासीं ॥२१॥समर्थ रामदास स्वामी

मनाचे श्लोक - संस्कृत रुपांतर (मनोबोधः)


मनो जन्ममृत्युप्रदां दु:खदात्रीम्‌ ।
धनाप्तप्रियाकामनां संत्यजाशु ॥
यतो यातना भर्गवासेऽस्त्यसह्या ।
ततोराघवे प्रीतियोगं कुरुष्व ॥२१॥समर्थ रामदास स्वामी

मनाचे श्लोक - अर्थ


श्रीसमर्थ इथे सांगत आहेत की, वासनांच्या आहारी न जाता मनाची शांतता टिकवण्याचा प्रयत्न करावा. धन-संपत्ती मिळवण्याचा लोभ टाळावा. मनाची अवस्था सारखी बदलत गेली की अति कष्ट सोसावे लागतात. भगवान श्रीरामचंद्रांनी जो मार्ग दाखवला आहे, त्यावर अखंडपणे चालावे.