Download MarathiMati.com's New Android App from Google Play

मनाचे श्लोक - श्लोक २०५

प्रकाशन: संपादक मंडळ | १ फेब्रुवारी २००८

मनाचे श्लोक - श्लोक २०५ | Manache Shlok - Shlok 205

मनाचे श्लोक - श्लोक २०५ - [Manache Shlok - Shlok 205] समर्थ रामदास स्वामींनी रचलेले मनाचे श्लोक, श्लोकाचा अर्थ, संस्कृत रुपांतर आणि चित्र/Graphic/Photo/Image स्वरूपात.

मनाचे श्लोक - श्लोक २०५


मनाची शते ऐकता दोष जाती ।
मतीमंद ते साधना योग्य होती ॥
चढे ज्ञान वैराग्य सामर्थ्य अंगी ।
म्हणे दास विश्वासत मुक्ति भोगी ॥२०५॥समर्थ रामदास स्वामी

मनाचे श्लोक - संस्कृत रुपांतर (मनोबोधः)


मनोबोधमाकर्ण्य दोषाः प्रयान्ति
जडाः साधना-योग्यतां चोपयान्ति ।
ततो ज्ञानवैराग्यसामर्थ्यलाभो
विमुक्तिस्ततो दासवाक्यप्रतीत्या ॥२०५॥समर्थ रामदास स्वामी

मनाचे श्लोक - अर्थ


श्रीसमर्थ सांगत आहेत की,
अगदी पहिला श्लोक नमनाचा आहे व या शेवटच्या श्लोकात फलश्रुती सांगितली आहे. अथपासून इतिपर्यंत हे दोनशे पाच श्लोक श्रवण केल्याने श्रोता सर्व पापांपासून मुक्त होतो, अगदी मूढ मनुष्य असला तरी आपण आता काहीतरी साधन करावे असे त्यास वाटू लागते, तसे तो साधक करू लागतो व क्रमाक्रमाने ज्ञान, वैराग्य आणि सामर्थ्य भगवान शंकराप्रमाणे (मागील श्लोक ८६ पहा) त्याच्या अंगी बाणू लागतात. शेवटी जे कोणी मुमुक्षु जन,

सद्गुरुवचन हृदंई धरी ।
तोची मोक्षाचा अधिकारी ॥

हा सिद्धांत जाणून, गुरुपदिष्ट मार्गाने अभ्यास करतील ते,

याचि जन्में येणेंची काळें ॥

जन्ममृत्यूपासून सुटून सायुज्यता मुक्ती मिळवतील.

Download MarathiMati.com's New Android App from Google Play