मनाचे श्लोक - श्लोक २०

प्रकाशन: संपादक मंडळ | २० फेब्रुवारी २००८

मनाचे श्लोक - श्लोक २० | Manache Shlok - Shlok 20

मनाचे श्लोक - श्लोक २० - [Manache Shlok - Shlok 20] समर्थ रामदास स्वामींनी रचलेले मनाचे श्लोक, श्लोकाचा अर्थ, संस्कृत रुपांतर आणि चित्र/Graphic/Photo/Image स्वरूपात.

मनाचे श्लोक - श्लोक २०


बहू हिंपुटी होईजे मायपोटी ।
नको रे मना यातना तेचि मोठी ॥
निरोधें पचे कोंडिले गर्भवासी ।
अधोमूख रे दु:ख त्या बाळकासीं ॥२०॥समर्थ रामदास स्वामी

मनाचे श्लोक - संस्कृत रुपांतर (मनोबोधः)


शिशु: पच्यते जाठरो वन्हिकुंडे ।
तदाऽध:शिराश्र्चोर्ध्वपाच्चातिखिन्न: ॥
अतीव श्रमो जायते मातृगर्भे ।
मनस्तन्न कांर्य यतो दु:खभाक्‌ स्याम्‌ ॥२०॥समर्थ रामदास स्वामी

मनाचे श्लोक - अर्थ


इथे श्रीसमर्थ मनाला सावध करताना सांगत आहेत की, जन्म-मृत्यूच्या असंख्य फेऱ्यांमध्ये जर आपण अडकलो तर त्यातून जाताना आपल्याला अनंत यातना भोगाव्या लागतात.