मनाचे श्लोक - श्लोक १९

प्रकाशन: संपादक मंडळ | १९ फेब्रुवारी २००८

मनाचे श्लोक - श्लोक १९ | Manache Shlok - Shlok 19

मनाचे श्लोक - श्लोक १९ - [Manache Shlok - Shlok 19] समर्थ रामदास स्वामींनी रचलेले मनाचे श्लोक, श्लोकाचा अर्थ, संस्कृत रुपांतर आणि चित्र/Graphic/Photo/Image स्वरूपात.

मनाचे श्लोक - श्लोक १९


मना सर्वथा सत्य सांडूं नको रे ।
मना सर्वथा मिथ्य मांडूं नको रे ॥
मना सत्य ते सत्य वाचे वदावे ।
मना मिथ्य तें मिथ्य सोडूनि द्यावें ॥१९॥समर्थ रामदास स्वामी

मनाचे श्लोक - संस्कृत रुपांतर (मनोबोधः)


मनो मा त्यज प्रायश: सत्य वस्तु ।
मनोऽसन्मतिं मा कृथा: सर्वथैव ॥
मनो ब्रूहि सत्यं सदा सद्वचोभि ।
र्मनोऽसत्त्यज प्राज्ञ मिथ्येति मत्वा ॥१९॥समर्थ रामदास स्वामी

मनाचे श्लोक - अर्थ


या श्लोकात श्रीसमर्थांचा मनाला उपदेश असा की, मना, वाणीत नेहमी खरेपणा असायला पाहिजे. नेहमी सत्यच बोलावे. मिथ्या म्हणजे खोटे, अर्थहीन बडबड टाळावी.