मनाचे श्लोक - श्लोक १८

प्रकाशन: संपादक मंडळ | १८ फेब्रुवारी २००८

मनाचे श्लोक - श्लोक १८ | Manache Shlok - Shlok 18

मनाचे श्लोक - श्लोक १८ - [Manache Shlok - Shlok 18] समर्थ रामदास स्वामींनी रचलेले मनाचे श्लोक, श्लोकाचा अर्थ, संस्कृत रुपांतर आणि चित्र/Graphic/Photo/Image स्वरूपात.

मनाचे श्लोक - श्लोक १८


मना राघवेंवीण आशा नको रे ।
मना मानवाची नको कीर्ति तूं रे ॥
जया वर्णिती वेद-शास्त्रे-पुराणें ।
तया वर्णितां सर्वही श्लाघ्यवाणे ॥१८॥समर्थ रामदास स्वामी

मनाचे श्लोक - संस्कृत रुपांतर (मनोबोधः)


मनो धारयाशां सदा राघवस्य ।
ततोऽन्यं नरं नैव संकीर्तय त्वम्‌ ॥
पुराणानि वेदाश्र्च यं वर्णयंति ।
नर: श्र्लोघ्यतामेति तद्वर्णनेन ॥१८॥समर्थ रामदास स्वामी

मनाचे श्लोक - अर्थ


या श्लोकात श्रीसमर्थ मनाला बोध करवून देत आहेत की, जीवनात एका रामाशिवाय आपण कुठल्याही आशेचा आधार घेता कामा नये. कारण आशा म्हणजे अपेक्षा, मग ती कुठलीही असो, ती दुःख देणारच. तेच जर सतत रामचिंतन घडले तर, सदा सर्वकाळ आनंद, समाधान आणि चिंतामुक्त स्थिती अनुभवायला मिळेल.

समर्थांचा मनाला अजून एक बोध असा की, एका पुरुषोत्तमा शिवाय कोणाचीही कीर्ति वर्णू नकोस. त्यासंबंधी एक ओवी अशी -
सेवकु मानवीयांचे ।
कष्टती बहुतांपरी ।
सेविला देव देवांचा ।
तेणें मी धन्य जाहालों ।
नीच हे मानवी प्राणी ।
नीचाश्रय कामा नये ।
महत्कीर्ति श्रीरामाची ।
फावला महदाश्रयो ॥