मनाचे श्लोक - श्लोक १७

प्रकाशन: संपादक मंडळ | १७ फेब्रुवारी २००८

मनाचे श्लोक - श्लोक १७ | Manache Shlok - Shlok 17

मनाचे श्लोक - श्लोक १७ - [Manache Shlok - Shlok 17] समर्थ रामदास स्वामींनी रचलेले मनाचे श्लोक, श्लोकाचा अर्थ, संस्कृत रुपांतर आणि चित्र/Graphic/Photo/Image स्वरूपात.

मनाचे श्लोक - श्लोक १७


मनीं मानवा व्यर्थ चिंता वहाते ।
अकस्मात होणार होऊनि जाते ॥
घडें भोगणे सर्वही कर्मयोगे ।
मतीमंद तें खेद मानी वियोगें ॥१७॥समर्थ रामदास स्वामी

मनाचे श्लोक - संस्कृत रुपांतर (मनोबोधः)


जनो मूढभावेन शोचत्यपार्थम्‌ ।
क्षणेनैव भाव्यं भवत्येव नित्यम्‌ ॥
भवेत्कर्मपणा स्वेन पुत्रादियोगो ।
वृथा खिद्यते तद्वियोगेऽल्पबुद्धि: ॥१७॥समर्थ रामदास स्वामी

मनाचे श्लोक - अर्थ


श्रीसमर्थांची मनाला येथे शिकवण आहे की,

सर्व कांही चिंता केली भगवंतानें ।
आपले चिंतेनें काय होते ॥

होणार तें कांही आतां पालटेना ।
तरी चिंता मना कां करीसी ॥

पूर्वसंचित आणि या जन्मातील कर्मांचे फळ मिळून जीवन जगताना जे चांगले-वाईट भोग वाट्याला येणारच आहेत, त्यांची व्यर्थ चिंता का करावी ? ते तर न चुकता घडणारच आहे.

हानी मृत्य लाभ होणार जाणार ।
सर्व ही संसार संचीताचा ।
लल्लाटीं लिहिलें होउनियां गेलें ।
संचीत भोगीलें पाहिजे तें ॥

मनाविरुद्ध गोष्टी घडल्याने किंवा मृत्यूमुळे होणाऱ्या वियोगाने मनुष्य त्याबाबतीत खेद करत बसतो. अशांना समर्थांनी मतीमंदची उपमा दिली आहे.