मनाचे श्लोक - श्लोक १६

प्रकाशन: संपादक मंडळ | १६ फेब्रुवारी २००८

मनाचे श्लोक - श्लोक १६ | Manache Shlok - Shlok 16

मनाचे श्लोक - श्लोक १६ - [Manache Shlok - Shlok 16] समर्थ रामदास स्वामींनी रचलेले मनाचे श्लोक, श्लोकाचा अर्थ, संस्कृत रुपांतर आणि चित्र/Graphic/Photo/Image स्वरूपात.

मनाचे श्लोक - श्लोक १६


मरे एक त्याचा दुजा शोक वाहे ।
अकस्मात तोही पुढे जात आहे ॥
पुरेना जनीं लोभ रे क्षोभ त्याते ।
म्हणोनी जनीं मागुता जन्म घेते ॥१६॥समर्थ रामदास स्वामी

मनाचे श्लोक - संस्कृत रुपांतर (मनोबोधः)


मृतं बंधुमालोक्य शोचत्यपार्थ: ।
क्षणात्सोऽपि मृयो: पथा संप्रयाति ॥
यतोऽज्ञस्य नो याति लोभ: प्रशांतिं ।
ततोऽसौ पुनर्देहयोगं प्रयाति ॥१६॥समर्थ रामदास स्वामी

मनाचे श्लोक - अर्थ


श्रीसमर्थांचा इथे मनाला उपदेश आहे की,

पहातों जनाला किती येक जाती ।
तनू टाकिताहे पुढें ते पहाती ।
गताच्या कथा काढितों अल्प कांही ।
पुढें लोक ते काढिती आमुच्या ही ॥

माणसाच्या मनात ठसलेला लोभ कधीही पूर्ण होत नाही, म्हणून उद्वेग प्राप्त होतो आणि त्यायोगे जीव पुन्हः जन्माला येतो. लोभ म्हणजे सदैव अतृप्त राहणारी गोष्ट होय, जी कधीच तृप्त होत नाही. त्यामुळे वासना पूर्ण करुन मग कधीतरी परमार्थ करु, अशा वेडेपणाच्या आशेवर माणसाने कधीही राहू नये. लोभाचा स्वभाव हा नेहमी अतृप्त राहण्याचाच आहे. मग तो कसा पूर्ण होणार? मनाला अनेक गोष्टींचा लोभ असल्यामुळे परिणामी आपला स्वभाव देखील रागीट बनत जातो. कारण लोभाने क्षोभ म्हणजे मानसिक अशांतता निर्माण होते. क्षोभाने मन आणखीनच खचते. म्हणून समर्थ मनला दुःखाचे मुळ असलेल्या लोभाला नष्ट करायला सांगत आहेत.