MarathiMati.com - Android App on Google Play Store

मनाचे श्लोक - श्लोक ११५

प्रकाशन: संपादक मंडळ | १८ मे २००८

मनाचे श्लोक - श्लोक ११५ | Manache Shlok - Shlok 115

मनाचे श्लोक - श्लोक ११५ - [Manache Shlok - Shlok 115] समर्थ रामदास स्वामींनी रचलेले मनाचे श्लोक, श्लोकाचा अर्थ, संस्कृत रुपांतर आणि चित्र/Graphic/Photo/Image स्वरूपात.

श्लोक ११५


तुटे वाद संवाद तेथें करावा ।
विविके अहंभाव हा पालटावा ॥
जनीं बोलण्यासारिखे आचरावें ।
क्रियापालटे भक्तिपंथेचि जावे ॥११५॥समर्थ रामदास स्वामी

संस्कृत रुपांतर


न यो वादभाक्‌ संवदेत्तेन पुंसा ।
विवेकादहंभावलेशोऽपि हेयः ॥
वदेद्याद्दगेवाऽऽचरेत्ताद्दगेव ।
मनःसत्क्रिया भक्तिमार्गेण लभ्या ॥११५॥समर्थ रामदास स्वामी

अर्थ


श्रीसमर्थ येथे स्पष्टपणे सांगत आहेत की, विचाराने तर आपण अभिमान सोडावाच पण, दुसऱ्या कोणाबरोबर वाद करण्यापूर्वी, त्याच्या ठिकाणी अहंकाराची बाधा कितपत आहे, हे ही बघावे. अहंकार असेल तर, वाद करू नये. कारण कोणताही पक्ष अभिमानाला पेटला, म्हणजे वादाचा शेवट लागत नाही. जेथे वाद मिटेल, तेथे तो करावा.

आपण आपली क्रिया पालटून हळूहळू भक्तिमार्गाला लागावे. आपण जी आडवाट धरलेली आहे ती सोडून, भक्तिमार्गाला लागावे.

MarathiMati.com - Android App on Google Play Store