मनाचे श्लोक - श्लोक ११३

प्रकाशन: संपादक मंडळ | १६ मे २००८

मनाचे श्लोक - श्लोक ११३ | Manache Shlok - Shlok 113

मनाचे श्लोक - श्लोक ११३ - [Manache Shlok - Shlok 113] समर्थ रामदास स्वामींनी रचलेले मनाचे श्लोक, श्लोकाचा अर्थ, संस्कृत रुपांतर आणि चित्र/Graphic/Photo/Image स्वरूपात.

मनाचे श्लोक - श्लोक ११३


जनी हीत पंडीत सांडीत गेले ।
अहंतागुणे ब्रह्मराक्षस जाले ॥
तयाहून व्युत्पन्न तो कोण आहे ।
मना सर्व जाणीव सांडुनि राहे ॥११३॥समर्थ रामदास स्वामी

मनाचे श्लोक - संस्कृत रुपांतर (मनोबोधः)


स्वकींय हितं पंडितास्त्याज्य दूरा ।
दहंताबलादद्रक्षसत्वं लभंते ॥
अहंतां विना नैव विद्वत्तमत्व ।
मतोऽज्ञत्वमानं मनस्ते प्रहेयम्‌ ॥११३॥समर्थ रामदास स्वामी

मनाचे श्लोक - अर्थ


श्रीसमर्थ म्हणतात की, असला हिताचा बोध पुष्कळांनी केला आहे खरा, पण त्याप्रमाणे कोणी आपले वर्तन ठेवते का ? जो तो आपल्या विद्वत्तेत, मोठेपणात चूर ! याचा परिणाम काय झाला ? विद्याभ्यासाने ज्यांचा अभिमान झडला नाही ते ब्रह्मराक्षस मार होऊन बसले.

परंतु आपण आपल्या विद्वत्तेचा, मोठेपणाचा किंवा आपल्या सामर्थ्याचा गर्व तरी कशाला करावा ? ईश्वरापेक्षा विद्वान व सामर्थ्यसंपन्न असा या जगात कोणीही नाही.

सारांश, हे मना, मी मोठा व माझे तेवढेच खरे, हा अभिमान सोडून देऊन रहा.