MarathiMati.com - Android App on Google Play Store

मनाचे श्लोक - श्लोक ११२

प्रकाशन: संपादक मंडळ | १५ मे २००८

मनाचे श्लोक - श्लोक ११२ | Manache Shlok - Shlok 112

मनाचे श्लोक - श्लोक ११२ - [Manache Shlok - Shlok 112] समर्थ रामदास स्वामींनी रचलेले मनाचे श्लोक, श्लोकाचा अर्थ, संस्कृत रुपांतर आणि चित्र/Graphic/Photo/Image स्वरूपात.

श्लोक ११२


जनीं सांगतां ऐकता जन्म गेला ।
परी वादवेवाद तैसाचि ठेला ॥
उठे संशयो वाद हा दंभधारी ।
तुटे वाद संवाद तो हीतकारी ॥११२॥समर्थ रामदास स्वामी

संस्कृत रुपांतर


गतं जन्म वक्तुस्तथा श्रोतुरेवं ।
परं वादधीर्नैव शांतिं प्रयाति ॥
उदेत्यामृतिं संशयो दांभिकस्य ।
यतो वादहानिः सुसंवाद इष्ट ॥११२॥समर्थ रामदास स्वामी

अर्थ


श्रीसमर्थ येथे म्हणतात की, जगाच्या आरंभापासून ते आतापर्यंत सांगणारे पुष्कळ व ऐकणारे त्याहून पुष्कळ होऊन गेले, परंतु वितंडवाद म्हणून ज्याला म्हणतात, तो अजूनही जशाचा तसा शिल्लक आहे.

ज्या वादापासून परस्परांची मने निर्मळ होण्याऐवजी संशयग्रस्त होतात, तो वाद दांभिक होय. असे का व्हावे ? बऱ्याच लोकांनी आजवर अनेक चांगल्या गोष्टी सांगितल्या असून व पुष्कळांनी त्या वाचल्या व ऐकल्या असूनही या जगात, वितंडवादाला अजून थारा का मिळाला ? याचे उत्तर श्रीसमर्थ पुढच्या श्लोकात देतात.

MarathiMati.com - Android App on Google Play Store