Download MarathiMati.com's New Android App from Google Play

मनाचे श्लोक - श्लोक १११

प्रकाशन: संपादक मंडळ | १४ मे २००८

मनाचे श्लोक - श्लोक १११ | Manache Shlok - Shlok 111

मनाचे श्लोक - श्लोक १११ - [Manache Shlok - Shlok 111] समर्थ रामदास स्वामींनी रचलेले मनाचे श्लोक, श्लोकाचा अर्थ, संस्कृत रुपांतर आणि चित्र/Graphic/Photo/Image स्वरूपात.

मनाचे श्लोक - श्लोक १११


हिताकारणे बोलणे सत्य आहे ।
हिताकारणे सर्व शोधुनि पाहें ॥
हितकारणे बंड पाखांड वारी ।
तुटे वाद संवाद तो हीतकारी ॥१११॥समर्थ रामदास स्वामी

मनाचे श्लोक - संस्कृत रुपांतर (मनोबोधः)


हितायाऽऽत्मनः सत्यवागीरितव्या ।
हितायात्मनश्र्चित्तशुद्धिर्विधेया ॥
हितायैव पाखंडबुद्धिर्विवर्ज्या ।
यतो वादहानिः सुसंवाद इष्ट ॥१११॥समर्थ रामदास स्वामी

मनाचे श्लोक - अर्थ


श्रीसमर्थ सांगत आहेत की, हिताकारणे म्हणजे हित व्हावे म्हणून, हे मना, तुझे हित व्हावे म्हणून या खऱ्या गोष्टी तुला सांगाव्या लागत आहेत. त्या तुला अप्रिय वाटल्या तरी त्या तुझ्या हिताच्या आहेत, म्हणून तू त्या ऐकल्या पाहिजेस.

हे मना, तुझे हित व्हावे अशी इच्छा असल्यास मी म्हणतो ते खरे आहे की खोटे, याचा विचार करून पहा. केवळ मी सांगतो म्हणून तू माझ्या गोष्टी ऐकाव्या, असा माझा आग्रह नाही.

पण, विचारांनी माझे म्हणणे तुला पटले तर धर्मशास्त्रनिषिद्ध अशी जी तू बडबड करत असतोस, ती त्वरीत सोडून दिली पाहिजेस. त्यातच तुझे हित दडलेले आहे, हे जाण.

Download MarathiMati.com's New Android App from Google Play