मनाचे श्लोक - श्लोक ११०

प्रकाशन: संपादक मंडळ | १३ मे २००८

मनाचे श्लोक - श्लोक ११० | Manache Shlok - Shlok 110

मनाचे श्लोक - श्लोक ११० - [Manache Shlok - Shlok 110] समर्थ रामदास स्वामींनी रचलेले मनाचे श्लोक, श्लोकाचा अर्थ, संस्कृत रुपांतर आणि चित्र/Graphic/Photo/Image स्वरूपात.

मनाचे श्लोक - श्लोक ११०


तुटे वाद संवाद त्याते म्हणावें ।
विवेके अहंभाव यातें जिणावें ॥
अहंतागुणे वाद नाना विकारी ।
तुटे वाद संवाद तो हीतकारी ॥११०॥समर्थ रामदास स्वामी

मनाचे श्लोक - संस्कृत रुपांतर (मनोबोधः)


असद्वादहा यः स संवाद एव ।
विवेकेन जेतव्य एवाभिमानः ॥
अहंतैव वादस्य मूलं प्रकृष्टं ।
यतो वादहानिः स संवाद इष्टः ॥११०॥समर्थ रामदास स्वामी

मनाचे श्लोक - अर्थ


श्रीसमर्थ म्हणतात की, संवाद म्हणजे खरा वाद. ज्यापासून वादाचा उलगडा होतो तोच खरा वाद, त्यालाच संवाद म्हणावे.

उभयपक्षी पक्षाभिमान आहे तोवर असला संवाद होणे शक्य नाही, यसाठी भल्यांनी विचार करून अहंकाराला जिंकले पाहिजे. ज्याच्या अंतरीचा अभिमान अजून गळालेला नाही, त्याने वाद करण्याच्या भरीस पडू नये.

अभिमानाला पेटून केलेला वाद क्रोध, मद, मत्सर इत्यादि अनेक विकार उत्पन्न करतो. तात्पर्य, मनुष्याच्या अंतगरणांत अहंकाराने जे ठाणें दिलेले असते, ते तेथून उठवून त्या ठिकाणी प्रेमाची स्थापना केल्यावाचून हितकारी वाद होणे शक्य नाही.