मनाचे श्लोक - श्लोक १०९

प्रकाशन: संपादक मंडळ | १२ मे २००८

मनाचे श्लोक - श्लोक १०९ | Manache Shlok - Shlok 109

मनाचे श्लोक - श्लोक १०९ - [Manache Shlok - Shlok 109] समर्थ रामदास स्वामींनी रचलेले मनाचे श्लोक, श्लोकाचा अर्थ, संस्कृत रुपांतर आणि चित्र/Graphic/Photo/Image स्वरूपात.

मनाचे श्लोक - श्लोक १०९


जनीं वादवेवाद सोडूनि द्यावा ।
जनीं वादसंवाद सूखे करावा ॥
जगीं तोचि तो शोकसंतापहारी ।
तुटे वाद संवाद तो हीतकारी ॥१०९॥समर्थ रामदास स्वामी

मनाचे श्लोक - संस्कृत रुपांतर (मनोबोधः)


वृथा वादबुद्धिं परित्यज्य दूरा ।
त्सुखेनोत्तमैः सद्विवादो विधेयः ॥
मनः शोकसंतापदोऽसद्विवादो ।
यतो वादहानिः सुसंवाद इष्ट ॥१०९॥समर्थ रामदास स्वामी

मनाचे श्लोक - अर्थ


श्रीसमर्थ या श्लोकात आपल्याला संवादाचे महत्त्व सांगत आहेत. ते म्हणतात की, वादवेवाद म्हणजे आग्रहाचा, अभिमानाचा, वितंड वाद होय. तो त्यागावा!

सुखसंवाद म्हणजे प्रेमाचा, निरहंकाराचा बोल होय, तो खुशाल करावा. कारण, अशाच सुखसंवादामुळे समस्त जगातील शोक आणि संताप नाहीशी होऊन, आनंद आणि शांती यांचे साम्राज्य सुरू होते. वितंड वादाला कारण आपल्या वृथा अभिमान व प्रेमरहित संवाद होय. भिन्न भिन्न मते असली तरीही, परस्परांचा द्वेष कधीही न करावा, प्रेम धरावे, प्रेमाने बोलावे, प्रेमाने ऐकावे. असा प्रेमसंवादच हितकारी होय.

नाना मतीं नाना भेद ।
भेदें वाढती वेवाद ।
परी तो ऐक्यतेचा संवाद ।
साधु जाणती ।