मनाचे श्लोक - श्लोक १०८

प्रकाशन: संपादक मंडळ | ११ मे २००८

मनाचे श्लोक - श्लोक १०८ | Manache Shlok - Shlok 108

मनाचे श्लोक - श्लोक १०८ - [Manache Shlok - Shlok 108] समर्थ रामदास स्वामींनी रचलेले मनाचे श्लोक, श्लोकाचा अर्थ, संस्कृत रुपांतर आणि चित्र/Graphic/Photo/Image स्वरूपात.

मनाचे श्लोक - श्लोक १०८


मना सर्वदा सज्जनाचेनि योगें ।
क्रिया पालटे भक्तिभावार्थ लागे ॥
क्रियेवीण वाचाळता ते निवारी ।
तुटे वाद संवाद तो हीतकारी ॥१०८॥समर्थ रामदास स्वामी

मनाचे श्लोक - संस्कृत रुपांतर (मनोबोधः)


मनाः सर्वदा साधुसंगेन पुंसां ।
भवेदिक्रियाहानिर्राशे च भक्तिः ॥
विना सत्क्रियां मास्तु वाचालता ते ।
यतो वादहानिः सुसंवाद इष्टः ॥१०८॥समर्थ रामदास स्वामी

मनाचे श्लोक - अर्थ


श्रीसमर्थ या श्लोकात, सत्संगाचा महिमा वर्णन करताना म्हणतात की, सत्संगामुळे मनुष्याची अशुद्ध क्रिया पालटून, त्याच्या ठिकाणी भक्तिभाव उत्पन्न होतो.

हे मना, कृती न करता फक्त बडबड करणे टाळ.
वर्तल्यावीण बोलावे ।
ते शब्द मिथ्या ॥

समर्थ म्हणतात की, ज्या भाषेमुळे वाद मिटतो तो ‘संवाद’ होय व तोच मनुष्यासाठी हितकारक असतो. बाकी सर्व वितंड वादच!