मनाचे श्लोक - श्लोक १०६

प्रकाशन: संपादक मंडळ | ९ मे २००८

मनाचे श्लोक - श्लोक १०६ | Manache Shlok - Shlok 106

मनाचे श्लोक - श्लोक १०६ - [Manache Shlok - Shlok 106] समर्थ रामदास स्वामींनी रचलेले मनाचे श्लोक, श्लोकाचा अर्थ, संस्कृत रुपांतर आणि चित्र/Graphic/Photo/Image स्वरूपात.

मनाचे श्लोक - श्लोक १०६


बरी स्नानसंध्या करी एकनिष्ठा ।
विवेके मना आवरी स्थानभ्रष्टा ॥
दया सर्वभुतीं जया मानवाला ।
सदा प्रेमळू भक्तिभावे निवाला ॥१०६॥समर्थ रामदास स्वामी

मनाचे श्लोक - संस्कृत रुपांतर (मनोबोधः)


सदा स्नानसंधयादिकं यः करोति ।
दया सर्वभूतेषू यस्य प्रवृद्धा ॥
मनो यच्छति भ्रष्टमात्मस्वरुपे ।
हरिः प्रीतियक्तो भवेत्तत्र पुंसि ॥१०६॥समर्थ रामदास स्वामी

मनाचे श्लोक - अर्थ


श्रीसमर्थ सांगत आहेत की, स्नानसंध्यादि कर्मे एकनिष्ठपणे करून, स्थानभ्रष्ट झालेल्या मनाला विवेकाच्या बळाने आवरावे. मनाचे वास्तविक स्थान निर्विषय आहे, तेथून ढळून मन विषयासक्त झालेले आहे. त्याला विषयापासून आवरावे.

सर्वां भूतांचे हृदय ।
नाम त्याचें रामराय ॥
असा प्रत्यय जर आला, तरच आणि तरच, भूतमात्राच्या ठिकाणी दया उत्पन्न होऊन मनाला शांती मिळेल.