Download MarathiMati.com's New Android App from Google Play

मनाचे श्लोक - श्लोक १०५

प्रकाशन: संपादक मंडळ | ८ मे २००८

मनाचे श्लोक - श्लोक १०५ | Manache Shlok - Shlok 105

मनाचे श्लोक - श्लोक १०५ - [Manache Shlok - Shlok 105] समर्थ रामदास स्वामींनी रचलेले मनाचे श्लोक, श्लोकाचा अर्थ, संस्कृत रुपांतर आणि चित्र/Graphic/Photo/Image स्वरूपात.

मनाचे श्लोक - श्लोक १०५


विवेके क्रिया आपुली पालटावी ।
अती आदरे शुद्ध क्रीया धरावी ॥
जनीं बोलण्यासारिखे चाल बापा ।
मना कल्पना सोडिं संसारतापा ॥१०५॥समर्थ रामदास स्वामी

मनाचे श्लोक - संस्कृत रुपांतर (मनोबोधः)


विवेकात्क्रियां स्वां परित्यज्य दूरा ।
द्विशुद्धां क्रियामादरेणारभस्व ॥
यथा भाषसे तेन मार्गेण याहि ।
मनः मल्पनां मुंच संसारदात्रीम्‌ ॥१०५॥समर्थ रामदास स्वामी

मनाचे श्लोक - अर्थ


श्रीसमर्थ या श्लोकातून सांगत आहेत की, वर्णाश्रमधर्माप्रमाणे आपली क्रिया होत नसेल तर वर्णाश्रमधर्माचा विचार करून आपण धर्मबाह्य क्रियेचा त्याग करून, शुद्ध क्रियेचा मनोभावे अवलंब केला पाहिजे.

शुद्ध क्रिया म्हणजे वर्णाश्रमधर्मयुक्त अशी क्रिया. ज्या क्रियेत बोलण्याचा आणि चालण्याचा मेळ असतो, ती शुद्ध क्रिया होय असे कोणी म्हणतात. हा ही अर्थ वावगा नाही, कारण वर्णाश्रमधर्माला सोडून कोणी बोलूच शकत नाही, किंबहुना हाच अर्थ येथे अभिप्रेत दिसतो. कारण पुढे तिसऱ्या चरणात, ‘जसे बोलतोस, तसे चाल’ असे श्रीसद्गुरु सांगत आहेत. अर्थात, बोलण्याप्रमाणे जी क्रिया, तीच दुसऱ्या चरणातील शुद्ध क्रिया.
बोला ऐसें वर्तो जाणे ।
उत्तम क्रिया ॥

हे मना, कल्पनोत्पन्न संसारताप सोड. संसार ही एक कल्पनाच आहे, तेव्हा त्या संसारापासून सुख-दुःख होते, ही सुद्धा नुसती कल्पनाच होय. हे मना, तुला जर बोलण्याप्रमाणे चालायचे असेल, तर संसारापासून सुख-दुःख होते अशी जी कल्पना तू करीतअसतोस, ती सोडली पहिजेस. नाहीतर तू जे म्हणतोस की ‘संसार मिथ्या आहे’, अशा नुसत्या म्हणण्यला काहीही अर्थ राहणार नाही.

Download MarathiMati.com's New Android App from Google Play