मनाचे श्लोक - श्लोक १०४

प्रकाशन: संपादक मंडळ | ७ मे २००८

मनाचे श्लोक - श्लोक १०४ | Manache Shlok - Shlok 104

मनाचे श्लोक - श्लोक १०४ - [Manache Shlok - Shlok 104] समर्थ रामदास स्वामींनी रचलेले मनाचे श्लोक, श्लोकाचा अर्थ, संस्कृत रुपांतर आणि चित्र/Graphic/Photo/Image स्वरूपात.

मनाचे श्लोक - श्लोक १०४


क्रियेवीण नानापरी बोलिजेंते ।
परी चित्त दुश्चीत तें लाजवीतें ॥
मना कल्पना धीट सैराट धांवे ।
तया मानवा देव कैसेनि पावे ॥१०४॥समर्थ रामदास स्वामी

मनाचे श्लोक - संस्कृत रुपांतर (मनोबोधः)


यथा वक्ति तदन्न यस्य प्रवृत्ति ।
र्विमूढस्य चित्तं न लज्जामुपैति ॥
परं स्वेच्छया यत्र कुत्र प्रयाति ।
न तेनाऽऽप्यते देवदेवः कदाचित्‌ ॥१०४॥समर्थ रामदास स्वामी

मनाचे श्लोक - अर्थ


या श्लोकात श्रीसमर्थ स्पष्टपणे सांगतात की, बोलण्याप्रमाणे स्वतः वर्तन न करता जो मनाला नुसता उपदेश करत जातो, त्याचे मन त्याला खात असते.
क्रियेवीण शब्दज्ञान ।
तें चि स्वानाचें वमन ।
भले तेथें अवलोकन ।
कदापि न करिती ॥

हे मना, स्वतः आपली क्रिया कशी होत आहे हे न पाहता, कल्पनेला नुसत्या भराऱ्या मारू दिल्याने देव कोणाला भेटला आहे काय? आपापल्या वर्णाश्रमधर्माप्रमाणे क्रिया घडली पाहिजे.