MarathiMati.com - Android App on Google Play Store

मनाचे श्लोक - श्लोक १०२

प्रकाशन: संपादक मंडळ | ५ मे २००८

मनाचे श्लोक - श्लोक १०२ | Manache Shlok - Shlok 102

मनाचे श्लोक - श्लोक १०२ - [Manache Shlok - Shlok 102] समर्थ रामदास स्वामींनी रचलेले मनाचे श्लोक, श्लोकाचा अर्थ, संस्कृत रुपांतर आणि चित्र/Graphic/Photo/Image स्वरूपात.

श्लोक १०२


अती लीनता सर्वभावे स्वभावें ।
जना सज्जनालागिं संतोषवावे ॥
देहे कारणीं सर्व लावीत जावें ।
सगूणीं अती आदरेसी भजावें ॥१०२॥समर्थ रामदास स्वामी

संस्कृत रुपांतर


प्रकृत्योररीकृत्य नम्रत्वमेव ।
मनःसज्जनास्तेन संतोषितव्याः ॥
परित्यज्य देहेऽभिमानं निरुढं ।
भजातिप्रमोदेन साकारमीशम् ॥१०२॥समर्थ रामदास स्वामी

अर्थ


श्रीसमर्थ म्हणतात की, मंहताचा स्वभावच असा असावा की, त्याने सर्वांशी मनोभावेकरून नम्रपणे वागून, सत्पुरुषांना संतोषवीत असावे.

संपूर्ण देह भगवत्कारणी झिजवीत जावा, नेत्रांनी सगुण मूर्तीचे दर्शन घ्यावे, नाकांनी श्रीपदावरील तुलसीचा सुगंध घ्यावा, जिव्हेने नामस्मरण करावे, कानांनी गुणानुवाद श्रवण करावे, मस्तकाने नमन करावे, हातांनी पूजन करावे, चरणांनी तीर्थयात्रा कराव्या, इत्यादि.

सर्व काळ राम मानसीं धरावा ।
वाचे उचारावा नामघोंष ॥ १ ॥
नामघोंष वाचे श्रवण कीर्तन ।
चरणी गमन देवाळया ॥ २ ॥
देवाळयां जातां सार्थक जाहालें ।
कारणीं लागलें कळीवर ॥ ३ ॥
कळीवर त्वचा जोडुनी हस्तक ।
ठेवावा मस्तक रामपाईं ॥ ४ ॥

सगुणाचेनि आधारें ।
निर्गुण पाविजे निर्धारें ॥

सगुणाची उपासना करता करता आपण निर्गुणापर्यंत पोचतो. म्हणून सगुणाची उपासना अति आदराने करावी. सर्व सृष्टी जेथे मिथ्या आहे, तेथे सगुणोपासना का करावी, अशी शंका घेऊ नये.

एवं सर्व सृष्टि मिथ्या जाण ।
जाणोनि रक्षावें सगुण ।
ऐसी हे अनुभवाची खूण ।
अनुभवी जाणती ॥

नुकतेच प्रकाशित नवीन लेखन

बाय - मराठी कथा | Bye - Marathi Katha

बाय

विभाग मराठी कथा

स्वभाव - मराठी कविता | Swabhav - Marathi Kavita

स्वभाव

विभाग मराठी कविता

आधार - मराठी कविता | Aadhar - Marathi Kavita

आधार

विभाग मराठी कविता

बायको - मराठी कविता | Baayko - Marathi Kavita

बायको

विभाग मराठी कविता

MarathiMati.com - Android App on Google Play Store