मनाचे श्लोक - श्लोक १०१

प्रकाशन: संपादक मंडळ | ४ मे २००८

मनाचे श्लोक - श्लोक १०१ | Manache Shlok - Shlok 101

मनाचे श्लोक - श्लोक १०१ - [Manache Shlok - Shlok 101] समर्थ रामदास स्वामींनी रचलेले मनाचे श्लोक, श्लोकाचा अर्थ, संस्कृत रुपांतर आणि चित्र/Graphic/Photo/Image स्वरूपात.

मनाचे श्लोक - श्लोक १०१


जया नावडे नाम त्या यम जाची ।
विकल्पे उठे तर्क त्या नर्क ची ची ॥
म्हणोनि अती आदरे नाम घ्यावे ।
मुखे बोलतां दोष जाती स्वभावें ॥१०१॥समर्थ रामदास स्वामी

मनाचे श्लोक - संस्कृत रुपांतर (मनोबोधः)


न यस्य प्रियं नाम तं शास्ति शौरि ।
र्विकल्पात्कुतर्के गतिर्नारकी स्यात्‌ ॥
अतोऽत्यादरेणैव संकीर्तितव्यं ।
यदुच्चारणे नैष दोषः प्रयाति ॥१०१॥समर्थ रामदास स्वामी

मनाचे श्लोक - अर्थ


श्रीसमर्थ येथे स्पष्टपणे सांगतात की, नामस्मरणाविषयी संशयग्रस्त होऊन जे तर्क-कुतर्क काढतात, त्यांना नरकवास प्राप्त होऊन त्यांची छी-थू होते.

गिरीकंदरें जाइजे दूरि दोषें ॥ ९२ ॥