मनाचे श्लोक - श्लोक १००

प्रकाशन: संपादक मंडळ | ३ मे २००८

मनाचे श्लोक - श्लोक १०० | Manache Shlok - Shlok 100

मनाचे श्लोक - श्लोक १०० - [Manache Shlok - Shlok 100] समर्थ रामदास स्वामींनी रचलेले मनाचे श्लोक, श्लोकाचा अर्थ, संस्कृत रुपांतर आणि चित्र/Graphic/Photo/Image स्वरूपात.

मनाचे श्लोक - श्लोक १००


यथासांग रे कर्म तेंहि घडेना ।
घडे धर्म तें पुण्य गांठी पडेना ॥
दया पाहतां सर्व भुतीं असेना ।
फुकाचे मुखी नाम तेंही वसेना ॥१००॥समर्थ रामदास स्वामी

मनाचे श्लोक - संस्कृत रुपांतर (मनोबोधः)


नृभिः कर्म कंर्तु न शक्यं समस्तं ।
कृतं चेदहंत्वात्फलं तन्न लभ्यम्‌ ॥
दया सर्वभूतेषु न क्रुरबुद्धेः ।
सवाच्यं हरेर्नाम नोऽज्ञस्य वक्रे ॥१००॥समर्थ रामदास स्वामी

मनाचे श्लोक - अर्थ


श्रीसमर्थ म्हणतात की, या कलियुगात यथाविधी कर्मे होत नाहीत, धर्म घडत नाही, घडलाच तर त्या मानाने त्याचे पुण्य पदरी पडत नाही, भूतमात्राविषयी अंतरी दया वसत नाही. अशा स्थितीत, भगवंताचे फुकटचे नाम तरी मुखी यावे, तर ते ही येत नाही. कसली ही दुर्दशा !

कलौ करितां हि न करवे स्वकर्म ।
धरितां हि न धरवे स्वधर्म ।
न कळे कैसें भूतदयावर्म ।
नाम हि फुकाचें न ये मुखीं ॥