MarathiMati.com - Android App on Google Play Store

मनाचे श्लोक

द्वारे | प्रकाशक संपादक मंडळ | १८ सप्टेंबर २००८

मनाचे श्लोक | Manache Shlok

समर्थ रामदास स्वामींनी रचलेले मनाचे श्लोक.

मनाचे श्लोक’ [Manache Shlok] हे समर्थ रामदास स्वामींनी रचलेले मानवी मनास मार्गदर्शनपर असे पद्य आहे.
मराठी पारंपारीक संस्कृतीत समर्थ रामदासकृत ‘मनाचे श्लोक’ सकाळच्या तसेच सायंकालीन प्रार्थनेत, प्रभातफेरीत आणि संप्रदायतील शिष्यांकडून भीक्षा मागतानाही आणि संस्कार व सुविचार म्हणूनही म्हटले जात.

॥ जय जय रघुवीर समर्थ ॥

मना सांग पां राखणा काय जाले।
अकस्मात ते राज्य सर्वै बुडाले॥
म्हणोनी कुडी वासना सांड वेगीं।
बळे लागला काळ हा पाठिलागी॥१३॥समर्थ रामदास स्वामी

जिवा कर्मयोगे जनीं जन्म जाला।
परी शेवटीं काळमूखीं निमाला॥
महाथोर ते मृत्युपंथेचि गेले।
कितीएक ते जन्मले आणि मेले॥१४॥समर्थ रामदास स्वामी

मना पाहतां सत्य हे मृत्युभूमी।
जितां बोलती सर्वही जीव मी मी॥
चिरंजीव हे सर्वही मानिताती।
अकस्मात सांडूनिया सर्व जाती॥१५॥समर्थ रामदास स्वामी

मरे एक त्याचा दुजा शोक वाहे।
अकस्मात तोही पुढे जात आहे॥
पुरेना जनीं लोभ रे क्षोभ त्याते।
म्हणोनी जनीं मागुता जन्म घेते॥१६॥समर्थ रामदास स्वामी

मनीं मानवा व्यर्थ चिंता वहाते।
अकस्मात होणार होऊनि जाते॥
घडें भोगणे सर्वही कर्मयोगे।
मतीमंद तें खेद मानी वियोगें॥१७॥समर्थ रामदास स्वामी

मना राघवेंवीण आशा नको रे।
मना मानवाची नको कीर्ति तूं रे॥
जया वर्णिती वेद-शास्त्रे-पुराणें।
तया वर्णितां सर्वही श्लाघ्यवाणे॥१८॥समर्थ रामदास स्वामी

मना सर्वथा सत्य सांडूं नको रे।
मना सर्वथा मिथ्य मांडूं नको रे॥
मना सत्य ते सत्य वाचे वदावे।
मना मिथ्य तें मिथ्य सोडूनि द्यावें॥१९॥समर्थ रामदास स्वामी

बहू हिंपुटी होईजे मायपोटी।
नको रे मना यातना तेचि मोठी॥
निरोधें पचे कोंडिले गर्भवासी।
अधोमूख रे दु:ख त्या बाळकासीं॥२०॥समर्थ रामदास स्वामी

मना वासना चूकवीं येरझारा।
मना कामना सांडी रे द्रव्यदारा॥
मना यातना थोर हे गर्भवासीं।
मना सज्जना भेटवीं राघवासीं॥२१॥समर्थ रामदास स्वामी

मना सज्जना हीत माझें करावें।
रघुनायका दृढ चित्ती धरावें॥
महाराज तो स्वामि वायुसुताचा।
जना उद्धरी नाथ लोकत्रयाचा॥२२॥समर्थ रामदास स्वामी

न बोलें मना राघवेवीण कांहीं।
जनी वाउगें बोलता सुख नाहीं॥
घडिने घडी काळ आयुष्य नेतो।
देहांतीं तुला कोण सोडूं पहातो?॥२३॥समर्थ रामदास स्वामी

रघुनायकावीण वांया शिणावे।
जनासारिखे व्यर्थ कां वोसणावें॥
सदा सर्वदा नाम वाचे वसो दे।
अहंता मनी पापिणी ते नसो दे॥२४॥समर्थ रामदास स्वामी

मनाचे श्लोक | Manache Shlok
मनाचे श्लोक | Manache Shlok
मनाचे श्लोक | Manache Shlok
मनाचे श्लोक | Manache Shlok
मनाचे श्लोक | Manache Shlok
मनाचे श्लोक | Manache Shlok
मनाचे श्लोक | Manache Shlok
मनाचे श्लोक | Manache Shlok
मनाचे श्लोक | Manache Shlok
मनाचे श्लोक | Manache Shlok
मनाचे श्लोक | Manache Shlok
मनाचे श्लोक | Manache Shlok
MarathiMati.com - Android App on Google Play Store