MarathiMati.com - Android App on Google Play Store

मनाचे श्लोक

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | १८ सप्टेंबर २००८

मनाचे श्लोक | Manache Shlok

समर्थ रामदास स्वामींनी रचलेले मनाचे श्लोक.

मनाचे श्लोक’ [Manache Shlok] हे समर्थ रामदास स्वामींनी रचलेले मानवी मनास मार्गदर्शनपर असे पद्य आहे.
मराठी पारंपारीक संस्कृतीत समर्थ रामदासकृत ‘मनाचे श्लोक’ सकाळच्या तसेच सायंकालीन प्रार्थनेत, प्रभातफेरीत आणि संप्रदायतील शिष्यांकडून भीक्षा मागतानाही आणि संस्कार व सुविचार म्हणूनही म्हटले जात.

॥ जय जय रघुवीर समर्थ ॥

सदा वीषयो चिंतितां जीव जाला।
अहंभाव अज्ञान जन्मास आला॥
विवेके सदा स्वस्वरुपी भरावे।
जिवा ऊगमी जन्म नाही स्वभावें॥१४५॥समर्थ रामदास स्वामी

दिसे लोचनी ते नसे कल्पकोडी।
अकस्मात आकारले काळ मोडी॥
पुढे सर्व जाईल कांही न राहे।
मना संत आनंत शोधुनि पाहे॥१४६॥समर्थ रामदास स्वामी

फुटेना तुटेना चळेना ढळेना।
सदा संचले मीपणे ते कळेना॥
तया एकरूपासि दूजे न साहे।
मना संत आनंत शोधुनि पाहें॥१४७॥समर्थ रामदास स्वामी

निराकार आधार ब्रह्मादिकांचा।
जया सांगतां शीणली वेदवाचा॥
विवेके तदाकार होऊनि राहें।
मना संत आनंत शोधुनि पाहे॥१४८॥समर्थ रामदास स्वामी

जगी पाहतां चर्मलक्षी न लक्षे।
जगी पाहता ज्ञानचक्षी निरक्षे॥
जनीं पाहता पाहणे जात आहे।
मना संत आनंत शोधुनि पाहे॥१४९॥समर्थ रामदास स्वामी

नसे पीत ना श्वेत ना श्याम कांही।
नसे व्यक्त अव्यक्त ना नीळ नाहीं॥
म्हणे दास विश्वासतां मुक्ति लाहे।
मना संत आनंत शोधुनि पाहे॥१५०॥समर्थ रामदास स्वामी

खरें शोधितां शोधितां शोधिताहे।
मना बोधिता बोधिता बोधिताहे॥
परी सर्वही सज्जनाचेनि योगे।
बरा निश्चयो पाविजे सानुरागे॥१५१॥समर्थ रामदास स्वामी

बहूतांपरी कूसरी तत्त्वझाडा।परी अंतरी पाहिजे तो निवाडा॥
मना सार साचार ते वेगळे रे।
समस्तांमधे एक ते आगळे रे॥१५२॥समर्थ रामदास स्वामी

नव्हे पिंडज्ञाने नव्हे तत्त्वज्ञाने ।
समाधान कांही नव्हे तानमाने॥
नव्हे योगयागें नव्हे भोगत्यागें।
समाधान ते सज्जनाचेनि योगे॥१५३॥समर्थ रामदास स्वामी

महावाक्य तत्त्वादिके पंचकर्णे।
खुणे पाविजे संतसंगे विवर्णे॥
द्वितीयेसि संकेत जो दाविजेतो।
तया सांडुनी चंद्रमा भाविजेतो॥१५४॥समर्थ रामदास स्वामी

दिसेना जनी तेचि शोधुनि पाहे।
बरे पाहता गूज तेथेचि आहे॥
करी घेउ जाता कदा आढळेना।
जनी सर्व कोंदाटले ते कळेना॥१५५॥समर्थ रामदास स्वामी

म्हणे जाणता तो जनी मूर्ख पाहे।
अतर्कासि तर्की असा कोण आहे॥
जनीं मीपणे पाहता पाहवेना।
तया लक्षितां वेगळे राहवेना॥१५६॥समर्थ रामदास स्वामी

मनाचे श्लोक | Manache Shlok
मनाचे श्लोक | Manache Shlok
मनाचे श्लोक | Manache Shlok
मनाचे श्लोक | Manache Shlok
मनाचे श्लोक | Manache Shlok
मनाचे श्लोक | Manache Shlok
मनाचे श्लोक | Manache Shlok
मनाचे श्लोक | Manache Shlok
मनाचे श्लोक | Manache Shlok
मनाचे श्लोक | Manache Shlok
मनाचे श्लोक | Manache Shlok
मनाचे श्लोक | Manache Shlok
MarathiMati.com - Android App on Google Play Store