MarathiMati.com - Android App on Google Play Store

मनाचे श्लोक

द्वारे | प्रकाशक संपादक मंडळ | १८ सप्टेंबर २००८

मनाचे श्लोक | Manache Shlok

समर्थ रामदास स्वामींनी रचलेले मनाचे श्लोक.

मनाचे श्लोक’ [Manache Shlok] हे समर्थ रामदास स्वामींनी रचलेले मानवी मनास मार्गदर्शनपर असे पद्य आहे.
मराठी पारंपारीक संस्कृतीत समर्थ रामदासकृत ‘मनाचे श्लोक’ सकाळच्या तसेच सायंकालीन प्रार्थनेत, प्रभातफेरीत आणि संप्रदायतील शिष्यांकडून भीक्षा मागतानाही आणि संस्कार व सुविचार म्हणूनही म्हटले जात.

॥ जय जय रघुवीर समर्थ ॥

हरीभक्त वीरक्त विज्ञानराशी।
जेणे मानसी स्थापिलें निश्चयासी॥
तया दर्शने स्पर्शने पुण्य जोडे।
तया भाषणें नष्ट संदेह मोडे॥१३३॥समर्थ रामदास स्वामी

नसे गर्व आंगी सदा वीतरागी।
क्षमा शांति भोगी दयादक्ष योगी॥
नसे लोभ ना क्षोम ना दैन्यवाणा।
इहीं लक्षणी जाणिजे योगिराणा॥१३४॥समर्थ रामदास स्वामी

धरीं रे मना संगती सज्जनाची।
जेणें वृत्ति हे पालटे दुर्जनाची॥
बळे भाव सद्बुद्धि सन्मार्ग लागे।
महाक्रुर तो काळ विक्राळ भंगे॥१३५॥समर्थ रामदास स्वामी

भयें व्यापिले सर्व ब्रह्मांड आहे।
भयातीत तें संत आनंत पाहे॥
जया पाहतां द्वैत कांही दिसेना।
भयो मानसीं सर्वथाही असेना॥१३६॥समर्थ रामदास स्वामी

जिवां श्रेष्ठ ते स्पष्ट सांगोनि गेले।
परी जीव अज्ञान तैसेचि ठेले॥
देहेबुद्धिचें कर्म खोटें टळेना।
जुने ठेवणें मीपणें आकळेना॥१३७॥समर्थ रामदास स्वामी

भ्रमे नाढळे वित्त तें गुप्त जाले।
जिवा जन्मदारिद्र्य ठाकुनि आले॥
देहेबुद्धिचा निश्चयो ज्या टळेना।
जुने ठेवणे मीपणे आकळेना॥१३८॥समर्थ रामदास स्वामी

पुढें पाहता सर्वही कोंदलेसें।
अभाग्यास हें दृश्य पाषाण भासे॥
अभावे कदा पुण्य गांठी पडेना।
जुने ठेवणे मीपणे आकळेना॥१३९॥समर्थ रामदास स्वामी

जयाचे तया चूकले प्राप्त नाहीं।
गुणे गोविले जाहले दुःख देहीं॥
गुणावेगळी वृत्ति तेहि वळेना।
जुने ठेवणे मीपणे आकळेना॥१४०॥समर्थ रामदास स्वामी

म्हणे दास सायास त्याचे करावे।
जनीं जाणता पाय त्याचे धरावे॥
गुरू अंजनेवीण तें आकळेना।
जुने ठेवणे मीपणे ते कळेना॥१४१॥समर्थ रामदास स्वामी

कळेना कळेना कळेना कळेना।
ढळे नाढळे संशयोही ढळेना॥
गळेना गळेना अहंता गळेना।
बळें आकळेना मिळेना मिळेना॥१४२॥समर्थ रामदास स्वामी

अविद्यागुणे मानवा उमजेना।
भ्रमे चुकले हीत ते आकळेना॥
परीक्षेविणे बांधले दृढ नाणें।
परी सत्य मिथ्या असें कोण जाणें॥१४३॥समर्थ रामदास स्वामी

जगी पाहतां साच ते काय आहे।
अती आदरे सत्य शोधुन पाहे॥
पुढे पाहतां पाहतां देव जोडे।
भ्रम भ्रांति अज्ञान हें सर्व मोडे॥१४४॥समर्थ रामदास स्वामी

मनाचे श्लोक | Manache Shlok
मनाचे श्लोक | Manache Shlok
मनाचे श्लोक | Manache Shlok
मनाचे श्लोक | Manache Shlok
मनाचे श्लोक | Manache Shlok
मनाचे श्लोक | Manache Shlok
मनाचे श्लोक | Manache Shlok
मनाचे श्लोक | Manache Shlok
मनाचे श्लोक | Manache Shlok
मनाचे श्लोक | Manache Shlok
मनाचे श्लोक | Manache Shlok
मनाचे श्लोक | Manache Shlok
MarathiMati.com - Android App on Google Play Store