नाशिक जिल्हा

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | २२ ऑगस्ट २००९

नाशिक जिल्हा | Nashik District

नाशिक जिल्हा - [Nashik District] नाशिक जिल्ह्याची माहिती, छायाचित्रे आणि व्हिडिओ [Nashik District Information, Photos and Videos].

सुप्रसिद्ध नाटककार वसंत कानेटकरज्ञानपीठ विजेते साहित्यिक वि.वा.शिरवाडकर उर्फ ‘कुसुमाग्रज’ यांची ही कर्मभूमी होय !

राम, लक्ष्मणसिता आपल्या वनवासाच्या काळात गोदावरी काठच्या वनातच वास्तव्याला होते. असे म्हटले जाते. येथेच लक्ष्मणाने शूर्पणखेचे नाक कापले, अशी आख्यायिका आहे. संस्कृतमध्ये नाकास ‘नासिका’ असे म्हटले जाते, त्यावरून ‘नाशिक’ हे नाव पडले असावे.

याच ठिकाणी इसवी सन १९०० मध्ये स्वातंत्र्यवीर सावरकरांनी ‘मित्रमेळा’ या संघटनेची स्थापना केली. या संघटनेचे रूपांतर पुढे १९०४ मध्ये जोसेफ मॅझिनीच्या ‘यंग इटली’ च्या धर्तीवरील ‘अभिनव भारत’ या क्रांतीकारी संघटनेत केले गेले.

क्रांतीकारकांचे जणू तिर्थक्षेत्र ठरलेल्या या शहरातील विजयानंद थिएटरमध्ये अनंत कान्हेरे या महाराष्ट्राच्या सुपुत्राने कलेक्टर जॅक्सनचा वध केला व पुढे हौतात्म्य पत्करले.

सुप्रसिद्ध नाटककार वसंत कानेटकरज्ञानपीठ विजेते साहित्यिक वि.वा.शिरवाडकर उर्फ ‘कुसुमाग्रज’ यांची ही कर्मभूमी होय !

धार्मिक व ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेला हा जिल्हा अलीकडील काळात एक अग्रगण्य ‘औद्योगिक जिल्हा’ होवू पाहात आहे !

त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग हे नाशिक पासून १८ किलोमीटर अंतरावर आहे.