MarathiMati.com - Android App on Google Play Store

त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | ३० जुलै २०१२

त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग | Trimbakeshwar Jyotirlinga

हेमाडपंथी पध्द्तीचं बांधकाम असलेल्या या मंदिराचे स्थापत्य आणि शिल्पकला हेही या मंदिराचे वैशिष्टच आहे.

नाशिक जिल्हयातील त्र्यंबकेश्वर हे १२ ज्योतिर्लिंगापैकी एक ज्योतिर्लिंग. या ज्योतिर्लिंगाचे वैशिष्टय म्हणजे या लिंगात ब्रम्हा, विष्णु आणि महेश हे तीन देव असल्याचे समजले जाते, म्हणून याला त्र्यंबकेश्वर म्हटले जाते.

हेमाडपंथी पध्द्तीचं बांधकाम असलेल्या या मंदिराचे स्थापत्य आणि शिल्पकला हेही या मंदिराचे वैशिष्टच आहे. १२०० वर्षांचा इतिहास असलेल्या या मंदिराचा जिरणोद्धार नानासाहेब पेशवे यांनी केला. त्याकाळी त्यांनी ३० लाख रुपये खर्च करुन मंदिराची डागडुजी केली. ५०० वर्षांपुर्वी इथं एक गाव वसलं होतं कालांतराने हे गाव त्र्यंबकेश्वर म्हणून नावारुपास आलं.

पेशवे काळात मंदिराबरोबरच गावाचा ही कायापालट झाला होता. या मंदिरातील ज्योतिर्लिंगावर पांडवकालीन मुकूट आहे. त्यावर मैवल्यवान हिरे आणि खडे जडलेले आहेत. नाशिक पासून १८ किलोमीटर अंतरावर असलेले त्र्यंबकेश्वर ब्रम्हगिरी पर्वताच्या पायथ्याशी आहे. या पर्वतावरच गोदावारी नदीचे उगमस्थान आहे. पुरणात ब्रम्हगिरी चा उल्लेख असून इथेच भगवान शंकरांनी स्वर्गातील गंगा पृथ्वीवर आणली असे समजले जाते.

नुकतेच प्रकाशित नवीन लेखन

बाय - मराठी कथा | Bye - Marathi Katha

बाय

विभाग मराठी कथा

स्वभाव - मराठी कविता | Swabhav - Marathi Kavita

स्वभाव

विभाग मराठी कविता

आधार - मराठी कविता | Aadhar - Marathi Kavita

आधार

विभाग मराठी कविता

बायको - मराठी कविता | Baayko - Marathi Kavita

बायको

विभाग मराठी कविता

MarathiMati.com - Android App on Google Play Store