मोरेश्वर-मोरगाव

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | ५ ऑगस्ट २००९

मोरेश्वर - मोरगाव | Moreshwar-Morgaon

मोरेश्वर-मोरगाव - [Moreshwar-Morgaon] अष्टविनायक ठिकाण असलेल्या मोरगाव येथील मोरेश्वर गणपती बद्दल माहिती, छायाचित्रे, व्हिडीओ आणि गुगल नकाशा. [Information, Photos, Videos and Google Map of Moreshwar-Morgaon Maharashtra, India] Page 6.

मोरगावचे थोर व दिव्य सत्पुरूष


  • श्री मदयोगीद्राचार्य शालिवाहन शके १४९९ मध्ये मोरगावात प्रगट झाले व शके १७२७ मध्ये त्यांनी समाधी घेतली. त्यांनी २२८ वर्षांचे भक्तिभावपूर्ण जीवन गणेशयोगाच्या साधनेत घालवले. त्यांना ब्राह्मणाच्या रूपात स्वतः मयुरेश्वरानी मुदगल पुराणाचा एक-एक असे नऊ खंड आणून दिले आणि त्यावर त्यांनी भाष्य लिहिले. यात गणपतीच्या योगस्वरूपाचे माहात्म्य आणि योगगीता आहे.
  • कऱ्हा नदीच्या दक्षिण तीरावर असलेले श्रीगणेश योगिंदाचार्यचे समाधी मंदिर प्रेक्षणीय आहे. त्याच मंदिरात श्रीमद अंकुशधारी महाराज व श्रीमद हेरंब महाराजाच्या समाध्या आहेत. या तीनही समाध्यांचे उत्सव, पुण्यतिथी वगैरे श्रद्धापूर्वक करतात. ह्या सांप्रदायाचा श्रीयोगिंदमठ मोरगावात देवळाजवळ आहे.
  • प्रसिद्ध साधू मोरया गोसावी यांचे मोरगाव हे जन्मस्थान आहे. येथील ब्रम्हकमंडल्य तीर्थात त्यांना एक गणेशमूर्ती सापडली, त्यांनी चिंचवड येथे मंदिर बांधून तेथे त्या मूर्तीची स्थापना केली. मोरया गोसावींची पालखी भाद्रपद शुद्ध चतुर्थी व माघ शुद्ध चतुर्थीस चिंचवडहून मोरगावास येते. मोरया गोसावींनी चिंचवड येथे इ.स. १६५५ च्या सुमारास समाधी घेतली.
  • सुखकर्ता, दुःखकर्ता वार्ताविघ्नाची
    नुरवी पुरवी प्रेम कृपा जयाची ।
    समर्थ रामदास स्वामींना मोरेश्वराचे दर्शन घेताना मंगलमूर्तीची वरील आरती स्फुरली. ही आरती आरतीसंग्रहात अजरामर झाली आहे. मयुरेश्वराच्या डाव्या बाजूला विघ्नेश्वराची ओवरी आहे. या ओवरीत सतराव्या शतकाच्या अखेरीस गणेश योगिंद हे थोर गणेशभक्त राहत. त्यांनी तेथे बारा वर्षे गणेश उपासना केली. त्यांनी संस्कृत गणेशपुराणावर टीका लिहिली आहे. त्यांनी शके १७२७ च्या माघ वद्य दशमीला मोरगाव येथे समाधी घेतली.