मोरेश्वर-मोरगाव

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | ५ ऑगस्ट २००९

मोरेश्वर - मोरगाव | Moreshwar-Morgaon

मोरेश्वर-मोरगाव - [Moreshwar-Morgaon] अष्टविनायक ठिकाण असलेल्या मोरगाव येथील मोरेश्वर गणपती बद्दल माहिती, छायाचित्रे, व्हिडीओ आणि गुगल नकाशा. [Information, Photos, Videos and Google Map of Moreshwar-Morgaon Maharashtra, India] Page 5.

मंदिरातील दररोजचे कार्यक्रम व उत्सव


श्री मयुरेश्वराची नित्य त्रिकाळ पूजा होते. पहाटे पाच वाजता प्रक्षाळपूजा होते. ही पूजा गुरवपुजारी करतो. नंतर सकाळी सात वाजता व दुपारी बारा वाजता षोडषोपचारे पूजा असते. ह्या पूजा ब्राम्हण पुजारी करतात. यावेळी गणपती अथर्वशिर्षाची आवर्तने म्हणण्यात येतात. त्रिकालपूजेत नैवेद्य असतो. सकाळच्या पूजेच्या वेळी खिचडी व पोळी, दुपारच्या पूजेच्यावेळी संपूर्ण जेवण आणि रात्रीच्या पूजेच्यावेळी दूध-भात हे पदार्थ असतात. रात्री आठ वाजता पंचोपचार पूजा होते. पहाटे पाच ते रात्री दहा वाजेपर्यंत मंदिर दर्शनासाठी खूले असते. नंतर शेजारती होऊन मंदिर बंद होते. भाद्रपद शुध्द चतुर्थी व माघ शुध्द चतुर्थी असे दोन उत्सव मोठ्या प्रमाणात साजरे होतात. याशिवाय विजयादशमीला रात्री ११.०० वा. मोरेश्वराची पालखी निघते. पालखीचा सोहळा मोठा पाहण्यासारखा असतो.

गावातच फटाके बनवतात व मोठ्या प्रमाणावर फोडतात. ठराविक स्थानी फिरून पालखी पहाटे दक्षिणेकडील सोमेश्वराच्या मंदिरात येते. त्यावेळी क्षेत्रातील सर्व पुरूषांची नावे परंपरात मानाप्रमाणे वाचली जातात. त्यानंतर पालखी मंदिरात येते. तेथे धुपारती झाल्यावर कार्यक्रम संपतो. माघ शुध्द पंचमीला अन्नसंतर्पण होते. अन्नसंतर्पण म्हणजे प्रत्येक घरातील थोडा-थोडा नैवेद्य गोळा करतात व मग तो भाविकांमध्ये वाटतात. या यात्रांना सुमारे १० ते १५ हजार लोक येतात.