मोरेश्वर-मोरगाव

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | ५ ऑगस्ट २००९

मोरेश्वर - मोरगाव | Moreshwar-Morgaon

मोरेश्वर-मोरगाव - [Moreshwar-Morgaon] अष्टविनायक ठिकाण असलेल्या मोरगाव येथील मोरेश्वर गणपती बद्दल माहिती, छायाचित्रे, व्हिडीओ आणि गुगल नकाशा. [Information, Photos, Videos and Google Map of Moreshwar-Morgaon Maharashtra, India] Page 4.

मयुरेश्वराची मूर्ती


गाभाऱ्यातील मयुरेश्वराची मूर्ती अत्यंत आकर्षक आहे. मूर्ती बैठी डाव्या सोंडेची व पूर्वाभिमुख आहे. ह्या मूर्तीला तीन डोळे असून डोळ्यात आणि बेंबीत हिरे चमकत असतात. डोक्यावर नागराजाचा फणा आणि बाजूला सिद्धी - बुद्धीच्या पितळी मूर्ती आहेत. मूर्तीच्या पुढे मूषक व मयूर आहेत. पूजा केलेली दुर्वा-फुले वाहिलेली मयुरेश्वराची मूर्ती प्रसन्न दिसते. ह्या मोरेश्वरावर अभिषेक केल्याने मनातल्या इच्छा पूर्ण होतात. देवस्थानाच्या कार्यालयात अभिषेकासाठी देणगी दिल्यावर, देवस्थान अभिषेक करून प्रसाद व अंगारा पाठवून देते. सर्व देवस्थानांमध्ये ही सोय आहे.

मयुरेश्वराची मूळ मूर्ती लहान आकाराची आहे. तिच्यावर शेंदराचे अनेक लेपावर लेप चढवल्याने ती आकाराने मोठी दिसते. केव्हातरी शे - सव्वाशे वर्षांनी हे शेंदराचे कवच निखळून पडते व आतील मूळची रेखीव मूर्ती दिसते. मोरगावाच्या मोरेश्वराचे कवच अशाप्रकाराचे सन १७८८ व सन १८२२ मध्ये पडल्याची माहिती समजते. या मूर्तीसंबंधी एक आख्यायिका आहे ती अशी..

सध्या जी मूर्ती आहे ती मूळ मूर्ती नव्हे. मूळ मूर्ती मृत्तिका, लोह व रत्न यांच्या अणूपासून बनवली असून ती सध्याच्या मूर्तीच्या मागे अदृश्य आहे. तिची स्थापना ब्रह्मादेवाने केली होती. सिंधुरासुराने तिचा विध्वंस केल्यावर ब्रह्मादेवाने दोन वेळा तिची प्राणप्रतिष्ठापना केली. पूढे काही काळानंतर पांडव तीर्थयात्रेनिमित येथे आले असता मूळ मूर्तीला कोणी धक्का लावू नये म्हणून तिला तांब्याच्या पत्र्याने बंदिस्त केले.