बल्लाळेश्वर-पाली

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | ५ ऑगस्ट २००९

बल्लाळेश्वर - पाली | Ballaleshwar-Pali - Page 8

बल्लाळेश्वर-पाली - [Ballaleshwar-Pali] अष्टविनायक ठिकाण असलेल्या पाली येथील बल्लाळेश्वर गणपती बद्दल माहिती, छायाचित्रे, व्हिडीओ आणि गुगल नकाशा. [Information, Photos, Videos and Google Map of Ballaleshwar-Pali Maharashtra, India] Page 8.

यात्रेकरुंसाठी अन्य उपयुक्त माहिती


  • यात्रेकरूना पहाटे ५ ते ११॥ वा. पर्यंत सोवळ्याने देवाची पूजा स्वहस्ते करता येते. संपूर्ण मंदिर रात्री साडेदहाला बंद होते आणि दुसऱ्या दिवशी पहाटे ५ वाजल्याशिवाय उघडले जात नाही.
  • मंदिरात प्रतिदिनी सनई वाजवणे, घुपारती, नैमित्तिक गायन, कीर्तन, चतुर्थ्यांना पालखी, नित्य पूजा, नैवेद्य, कार्तिकात काकड आरती इ. कार्यक्रम होतात.
  • संस्थेतर्फे श्रीबल्लाळेश्वराचा रंगीत फोटो व संस्थेची पुस्तिका नाममात्र किंमतीने विकली जाते.
  • भक्तांना राहण्यासाठी संस्थानाने अद्यावत सोयींनीयुक्त अशी धर्मशाळा बांधली आहे.
  • देवाचे सोन्या-चांदीचे अलंकार आहेत. मुकुट, कर्ण, सेज हे रोज वापरण्यात येतात व चतुर्थीला पुतळींचा हार, कंठा वगैरे अलंकार घातले जातात.
  • पाली कोकण प्रांतात येत असल्यामुळे इथे हिरवाई भरपूर आहे. नारळी, केळीची झाडे भरपूर आहेत. प्रत्येक दुकानात पोह्याचे, नाचणीचे पापड, करवंदाचा जॅम वगैरे घरगुती पदार्थ विक्रीस दिसतात.

पालीस जाऊन हिरवे व्हा आणि बल्लाळेश्वराचा आशीर्वाद घ्या. श्रीबल्लाळेश्वर नवसाला पावतोच पावतो असा अनेकाचा अनुभव आहे.

॥ श्री बल्लाळ विनायक विजयतो ॥