बल्लाळेश्वर-पाली

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | ५ ऑगस्ट २००९

बल्लाळेश्वर - पाली | Ballaleshwar-Pali - Page 7

बल्लाळेश्वर-पाली - [Ballaleshwar-Pali] अष्टविनायक ठिकाण असलेल्या पाली येथील बल्लाळेश्वर गणपती बद्दल माहिती, छायाचित्रे, व्हिडीओ आणि गुगल नकाशा. [Information, Photos, Videos and Google Map of Ballaleshwar-Pali Maharashtra, India] Page 7.

पाली परिसरातीलकाही रम्य स्थळे


  • पालीपासून ४ कि.मी. अंतरावर भूगर्भातून भूपृष्ठावर वाहणारा गंधयुक्त गरम पाण्याचा झरा उन्हेरी गावी आहे.
  • भोर संस्थानिकांची कुलदेवता श्रीभोराईदेवी येथून १५ कि.मी. अंतरावर सुधागड किल्ल्यावर असून देवीची स्थापना भृगू ऋषींनी केली आहे. १९४७ सालापर्यंत गडावर १० दिवस मोठ्या प्रमाणात नवरात्रोत्सव होत असे. देवीचे स्थान जागृत आहे.
  • गोमाशी येथील एका डोंगरात भृगू ऋषींचे स्थान असून जवळच ठाणाळे येथे कोरीव लेणी आहे.
  • देवालयातून दिसणारा २ कि.मी. अंतरावर, शिवाजी महाराजांचे काळातील ‘सरसगड’ हा टेहाळणीचा किल्ला आहे.
  • राम दंडकारण्यात असताना, प्रत्यक्ष देवीने ज्या ठिकाणी वर दिला ते ‘वरदायिनी’ हे अत्यंत निसर्गरम्य व जागृत स्थान पालीपासून ९ कि.मी. वर एका डोंगरावर आहे. सध्याचा पाली गावास होणारा पाणी पुरवठा येथूनच केला जातो.
  • रावणाने जटायुशी युद्ध करून त्याचे पंख जेथे कापले आणि श्रीरामने जटायूचा उद्धार जेथे केला ते ‘उद्धर’ स्थान पाली येथून १४ कि.मी. अंतरावर आहे. तेथून वर रामेश्वर येथे श्रीशंकराचे स्वयंभू स्थान आहे. येथे अस्थी पाण्यात विरघळतात.
  • ३५० वर्षापूर्वीचे पाषाणी स्वयंभू श्रीशंकराचे स्थान सिद्धेश्वर पालीपासून ३ कि.मी. अंतरावर आहे.