पर्यावरणपूरक गणेशोत्सव | Eco-friendly Ganeshotsav

बल्लाळेश्वर-पाली

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | ५ ऑगस्ट २००९

बल्लाळेश्वर - पाली | Ballaleshwar-Pali - Page 6

बल्लाळेश्वर-पाली - [Ballaleshwar-Pali] अष्टविनायक ठिकाण असलेल्या पाली येथील बल्लाळेश्वर गणपती बद्दल माहिती, छायाचित्रे, व्हिडीओ आणि गुगल नकाशा. [Information, Photos, Videos and Google Map of Ballaleshwar-Pali Maharashtra, India] Page 6.

नित्य कार्यक्रम व उत्सव


भाद्रपद शुद्ध प्रतिपदा ते पंचमी व माघ शुद्ध प्रतिपदा ते पंचमी असे दोन मोठे उत्सव येथे साजरे होतात. भाद्रपद चतुर्थीला रत्री महानैवद्य, पंचमीला दहीकाला व अन्नसंतर्पण असते. पाचही दिवस कथाकिर्तनाचा कार्यक्रम असतो. माघी उत्सवाची यात्रा फार मोठी असते. सुमारे १५ ते २० हजार लोक यात्रेला येतात. माघी उत्सवात शुद्ध पंचमीला लळीत करण्याची फार जुनी प्रथा आहे. तृतियेला देवाची पालखी निघते. पालखीत नारळ व मूर्ती ठेवतात. पालखी पाली गावात घरोघरी जाते. लोक देवाची पूजा करतात. पालखीत नारळ व पैसे ठेवतात. पहाटे काकडआरती, मग महापूजा व संध्याकाळी धुपारती व रात्री किर्तन असा कार्यक्रम असतो. माघी चतुर्थीला श्रीगजानन मध्यरात्री येथे भोजनास येतात अशी श्रद्धा असल्याने त्यावेळी भाविकांची फार गर्दी होते. विजयादशमीला पालखी निघते.

Book Home in Konkan