बल्लाळेश्वर-पाली

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | ५ ऑगस्ट २००९

बल्लाळेश्वर - पाली | Ballaleshwar-Pali

बल्लाळेश्वर-पाली - [Ballaleshwar-Pali] अष्टविनायक ठिकाण असलेल्या पाली येथील बल्लाळेश्वर गणपती बद्दल माहिती, छायाचित्रे, व्हिडीओ आणि गुगल नकाशा. [Information, Photos, Videos and Google Map of Ballaleshwar-Pali Maharashtra, India].

वैदे : संस्तुतवैभवी गजमुखो भक्ताभिमानीति यो ।
बल्लाळारव्य सुभक्तपाल नरतः ख्यातः सदा तिष्ठरी ॥
क्षेत्रे पल्लिपुरे यथा कृतयुगे वास्मिस्तथा लौकिके ।
भक्तैर्भवितमूर्तीमान गणपती सिद्धीश्वर तं भजे ॥७॥

अर्थ
वेदांमध्ये ज्याची स्तुती गायलेली आहे. ज्याचे मुख गजासारखे आहे, जो भक्ताच्या नावाने (बल्लाळेश्वर) म्हणून प्रसिद्धी पावलेला आहे, जो आपल्या भक्तांच्या पालनामध्ये मग्न आहे. या कृतयुगामध्ये पल्लिपूर म्हणजे पालीमध्ये जो वास करतो ज्यांची मूर्ती भक्तांना आवडणारी आहे अशा सिद्धीश्वर गणेशाला मी पूजितो / पूजिते.


एका बाजूला इतिहास प्रसिद्ध सरसगड उभा आहे तर दुसऱ्या बाजूला अंबा नदी वाहत आहे आणि त्या दोघांच्या सान्निध्यात एक गाव वसले आहे ‘पाली’ आणि त्या गावच्या बल्लाळ नावाच्या गणेशभक्त बालकाच्या भक्तीवर संतुष्ट होऊन त्या बालकाने पुजलेल्या शिळेत कायम वास्तव्य करून राहिलाय तो ‘पालीचा बल्लाळेश्वर’. भक्ताच्या नावाने प्रसिद्धी पावलेला आणि उपरण, अंगरखासारखी वस्त्रे नेसलेला अष्टविनायकातील हा एकमेव पालीचा श्रीबल्लाळेश्वर, भक्त बल्लाळाला विनायकाने ब्राह्मणाच्या वेषात दर्शन दिल्यामुळे इथली विनायक मूर्ती वस्त्रे नेसलेली आहे.

हे स्थान अत्यंत प्रसिद्ध व फार जागृत आहे. असं म्हणतात, की पेशवेकाळात या देवस्थानाला कौल लावून न्यायनिवाडे होत. ‘सिंधुदेशेऽतिविख्याता पल्लीनामाऽभुवत्पुरी’ असा उल्लेख आलेला आहे. यातील पल्ली म्हणजेच रायगड जिल्ह्यातील पाली येथील श्री बल्लाळेश्वर विनायक.