Maharashtra | महाराष्ट्र
MarathiMati.com - Android App on Google Play Store

देवबांध | Devbandh

Devbandh Ganpati
Devbandh Ganapati, Mokhada

गेल्या वीस वर्षापासून ठाणे जिल्ह्यातील मोखाडा तालुक्यात देवबांध-नाशेरा या ठिकाणी सह्याद्री आदिवासी बहुविध सेवा संघाचा एक प्रकल्प चालू आहे. या परिसरात वनवासी समाजाची वस्ती सुमारे ९० टक्के आहे. वनवासी समाजाच्या सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक, विकासाच्या योजनाबरोबरच धार्मिक जागरणाचे विविध उपक्रम व्हावे. ह्या हेतूने श्री सुंदरनारायण गणेश संस्कार केंद्राची योजना साकार झाली. श्री. सुंदरनारायण गणेश संस्कार केंद्राच्या वतीने देवबांध येथे एक सुंदर वास्तू बांधण्यात आली व त्यात कै. मा. वसंतराव दीक्षित यांनी संस्थेला भेट दिलेल्या सुंदर गणेश मूर्तीची प्रतिष्ठापना दि. १२ फेब्रुवारी १९८६ या दिवशी करण्यात आली. या कार्यक्रमासाठी परिसरातील हजारो वनवासी व मुंबई, ठाणे, नाशिक, कल्याण, डोंबिवली व इतर शहरातून मोठ्या संख्येने नागरीबांधव आले होते. दरवर्षी माघी गणेश जयंतीच्या दिवशी वर्धापनदिन भव्य स्वरूपात साजरा करण्यात येतो.

Devbandh Ganapati Temple

श्री गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना झाल्यापासून ह्या परिसरातील अनेक वनवासी बांधव व दर्शनार्थिची येजा सुरू झाली आहे. अनेक वनवासी बंधु येथे येऊन भजन कीर्तनांदि कार्यक्रम स्वतःहून करत आहेत. परिसरातील अनेकाचे हे श्रद्धास्थान, प्रेरणास्थान झाले आहे. सरकार केंद्राप्रमाणेच विविध उपक्रम चालू केले आहेत.

रूग्णसेवा

Sundar Narayan Ganesh Sanskar Kendra

गेली १५ वर्षे देवबांध केंद्रावर रूग्णसेवा केंद्र चालवले जात आहे. प्रत्येक महिन्याच्या दुसऱ्या व चौथ्या रविवारी ठाणे, डोंबिवली, घोटी, इगतपुरी येथील डॉक्टर्स व स्वयंसेवक नियमित येत असतात. सुमारे १०० गावपाड्यातील सरासरी ४०० रूग्ण या सेवेचा लाभ घेतात. त्यांची तपासणी करून त्यांना विनामूल्य औषध पुरवले जाते. गंभीर स्वरूपाचा आजार असेल तर अशा रूग्णास ठाणे-नाशिक विरार येथिल रूग्णालयात पाठवून विनामूल्य उपचाराची व्यवस्था करण्याचा प्रयत्न केला जातो.

वैद्यकीय सेवेच्या या वाढत्या पसाऱ्यासाठी स्वतंत्र गरज भासू लागली. १९८७ साली शिवाजीपार्क दादर व मुलुंडच्या लायन्स क्लब व अन्य संस्थांच्या सहकार्याने सुंदर वास्तु बांधुन झाली. कै. नाना पवार यांच्या प्रयत्नातून भांडूप येथिल संस्था व दानशूर व्यक्तींनी औषध ठेवण्यासाठी कपाटे, मोठी टेबल, खुर्च्या इ. साहित्य देणगी केंद्रास दिल्या म्हणून याचा फार चांगला उपयोग होत आहे. वैद्यकीय सेवेच्या वास्तुसाठी मुंबईचे श्री गोपाळजी हिंगोराणी आदि मान्यवरांनी प्रयत्न केले. अनेक औषधी उत्पादक, डॉक्टर इ. कडून विनामूल्य औषधपुरवठा होत आहे. काही औषधे टिकविण्यासाठी फ्रीजची आवश्यकता आहे. हे लक्ष्यात घेऊन I.D.I. स्नेहपरिवार या संस्थेने एक फ्रीज घेऊन दिला.

वनौषधि व पारंपारिक औषधि संवर्धन

देवबांध परिसरात व जवळच्या जंगलात औषधी वनस्पती आहेत व इतरही पारंपारिक औषधी वापरल्या जातात. या वनस्पतीचे संवर्धन होणे आवश्यक आहे. त्यासाठी देवबांध परिसरातील चिखलीचा माळ या जागेत १९८८ पासून वनौषधीची लागवड केली जात आहे. यासाठी पुण्याचे वैद्य खडीवाले यांचे उत्तम सहकार्य व मार्गदर्शन मिळत आहे. तसेच गोमूत्र, ओवा, निरगुडी, गवती चहा. पारंपारिक औषधांवर इतरत्र चाललेल्या (विदर्भ) येथील आदर्श गोसेवा व अनुसंघान केंद्राचे सहकार्य मिळत आहे.
वनस्पतीच्या लागवडीसाठी पावसाळी पानी अडवण्यासाठी एक चांगला बंधारा बांधण्याचा संकल्प आहे.

वसतिगृह

गेल्या १५ वर्षापासुन खोडाळा परिसरातील वनवासी विद्यार्थ्यासाठी वसतिगृह सुरू केले. सुरवातील ५ (पाच) विद्यार्थ्यांना घेऊन खोडाळा येथे सुसज्ज वास्तूत चालवले जात आहे. विद्यार्थ्याची निवड आर्थिक दुर्बल वनवासी परिवारातून केली जाते. शिक्षण व सरकार या बरोबरच ते आपल्या गावात कार्यकर्ता म्हणून उभे राहावेत अशाप्रकारचे कार्यक्रम घेतले जातात. वसतिगृहाचे व्यवस्थापन माजी विद्यार्थी बघत आहेत.

कूपनलिका

रा. स्व. संघ जनकल्याण समिती महाराष्ट्र यांच्या सहकार्याने एक कूपनलिका खोदली आहे. तसेच डोंबिवलीचे ठेकेदार श्री. काशिनाथपंत देसाई यांच्या सौजन्याने १६ व्यासाची विहीर बांधली अहे. यामुळे केंद्रावर व वाटसरूना उन्हाळ्यातही पिण्याच्या पाण्याची चांगली व्यवस्था झाली आहे.

गोपालन

संस्थेने गाईच्या स्थानिक जातीचे संवर्धन व्हावे या हेतूने गोपालनाचा कार्यक्रम हाती घेतला आहे. गाईसाठी उत्तम मोठा बांधला आहे. सध्या गाई, वासरे बैल मिळून २५ जनावरे आहेत. एक गोबरगॅस प्लांट I.D.Iस्नेह परिवाराने बांधुन दिला आहे. त्यामुळे इंधनखर्चात कपात करणे साध्य झाले आहे.

शेती प्रकल्प

नाशिक येथील सुंदरनारायण देवस्थानाकडून मिळालेल्या जमिनीवर स्थानिक मंडळीच्या सहकार्याने भात-नागली इ. पीके घेतली जात आहेत. आधुनिक तंत्राचा वापर करून शेतात अधिक उत्पन्न कसे वाढवता येईल याचे प्रयोग वनवासी बांधवांना दाखविले जातात. कृत्रिम खताचा वापर न करता, कंपोस्ट खत, शेणखत, गांडूळखत इ. चा वापर केला जातो. याखताचे उत्पादनही केंद्रावर केले जाते. यातून काहीजणांचा रोजगार उपलब्ध होत आहे.

गणपती उत्सव

देवबांध परिसरातील सुमारे ५१ गाव-पाड्यावर सार्वजनिक गणेशोत्सव केंद्राच्या प्रेरणेने सुरू झाला आहे. गावातील सर्वजण या निमित्ताने एकत्र येतात. उत्तम आरास, विविध कार्यक्रम, ग्रामस्वच्छता इ. कार्यक्रम करतात. तसेच वनवासी भागात दारूचे व्यसन मोठ्या प्रमाणावर आहे. गणेशोत्सवाच्या माध्यमातून प्रबोधन करून व्यसनमुक्तीची शपथ देण्याचा कार्यक्रम संस्थेचे कार्यकर्ते करत असतात. या प्रयत्नातून अनेक वनवासी बांधव व्यसनमुक्त झाले असा अनुभव आहे.

भाऊबीज भेट योजना

दरवर्षी देवबांध परिसरातील एक गाव निवडून तेथील वनवासी भगिनींना भाऊबीज भेट दिली जाते. दिपावलीच्या नंतर येणाऱ्या पहिल्या रविवारी होणाऱ्या या कार्यक्रमासाठी लागणारा निधी, फराळ व भेट वस्तू शहरातून गोळा केला जातात. व त्याला शहरी बांधव आनंदाने व तत्परतेने प्रतिसाद देतात असा अनुभव आहे.

याच माध्यमातून देवबांध परिसरातील १० गावात भजनी मंडळांना भजनाचे साहित्य भेट देण्यात आले त्यातून धर्मजागरणाचा एक यशस्वी प्रयोग संस्थेने केला आहे.

 

विशेष सहकार्य

I.D.I. स्नेहपरिवार शहाड कल्याण यांनी गोबरगॅस प्लांट, वैद्यकीय सेवेसाठी फ्रीज, हनुमान टेकडी पाणी प्रकल्पासाठी आर्थिक व तंत्रज्ञानरूपाने सहकार्य केले. प्रतिवर्षी एका उपक्रमासाठी सहकार्य करण्याचा मनोदय आहे. त्यांची महिंद्र आणि महिंद्रा इगतपुरी या कंपनीतील कर्मचाऱ्यांनी काही विद्यार्थ्याचे पालकत्व स्वीकारले आहे.

I.D.I पवई व श्री. जयंतराव वाडेकर यांनी संशोधीत केलेली बैलगाडी केंद्रासाठी दिली व त्याचे अन्य प्रकारेही सहकार्य होत आहे.

जीवदानी मंदिर, विरार, श्री. विठ्ठलनाथ संस्थान विरार यांचेकडून प्रतिवर्षी साडी व गणवेषाचे कापड मिळत आहे. टाइड वॉटर ऑईल कंपनी VEEDOL यांचेकडून रूग्णसेवेसाठी विशेष मदत.

संस्थेच्या वतीने करण्यात येत असलेल्या कार्याची थोडक्यात माहिती येथे दिली आहे. वनवासी समाजाच्या विकासासाठी आणखी अनेक उपक्रम करावयाचे आहेत परंतु पैशाशिवाय काही करता येत नाही. संस्थेने आजपर्यंत केलेली कामे आपल्याच सहकार्याने केली आहेत. असेच सहकार्य यापुढेही करावे व अनेकांना सहकर्यासाठी प्रवृत्त करावे हेच नम्र विनंती

 

निधी संकलन

वरील सर्व उपक्रम यशस्वी करण्यासाठी खालीलप्रमाणे निधि संकलन केले जाते.

 • केंद्र संचालन निधी - रु. ५०१/- हा निधी बँकेत कायमठेव म्हणून ठेवला जातो त्याच्या व्याजातून संस्कार केंद्राचा खर्च केला जातो.
 • विद्यार्थी सहाय्यक निधि - रु. १००१/- हा निधी बँकेत कायमठेव म्हणून ठेवला जातो त्याच्या व्याजातून आपण सुचविलेल्या दिवशी विद्यार्थ्यांना भोजन दिले जाते.
 • विद्यार्थी पालक योजना - रु २४००/- वसतिगृहातील एका विद्यार्थ्याचे एक वर्षाचे पालकत्व यातून वर्षाचा शैक्षणिक खर्च व भोजन खर्च केला जातो.
 • भोजन निधी - विद्यार्थ्यासाठी रु. १५०/- दिल्यास आपण सुचविलेल्या दिवशी एक वेळेचे भोजन दिले जाते.
 • रूग्ण सेवा निधी - रु. १०००/- व त्या पटित हा निधी बँकेत ठेवून त्याच्या व्याजातून औषधे खरेदी वा तत्सम खर्च करण्यात येतो.
 • गोग्रास निधी - केंद्रावरील गोधनासाठी चारापाणी रु. १५०/- आहे.
 • स्मृतिवन - संस्थेचे पालक कै. दादा चोळकर यांच्या नावाने स्मृतिवन आकार घेत आहे. एका झाडासाठी रु ५००/- च्या देणगीतून खर्च करण्यात येईल.
 • गणेशोत्सव निधी - रु १०००/- किंवा त्या पटीत या रकमेच्या व्याजातून देवबांध परिसरातील सुमारे ५१ गावातील सार्वजनिक गणेशोत्सव व अन्य उत्सव यासाठी खर्च करण्यात येईल.
 • केंद्र निर्माण निधी - केंद्रावर अत्यावश्यक वास्तू व इतर बांधकामासाठी या निधीचा वापर होतो.

संस्थेला आयकर मुक्त प्रमाणपत्र 80 G सवलत प्राप्त आहे.

[THN / CIT - II/ Trust / 80G / 307/ 598/2005- 06 Date 11-04-2005 to 31-03-2008]

चेक किंवा ड्राफ्ट “ सह्याद्री अदिवासी बहुविध सेवा संघ” या नावाने काढावेत

संपर्क पत्ता

मुंबई

श्री. विनायक वसंत दीक्षित.

निवेदिता ब्लॉक क्र. ६, सुभाष रोड,

विलेपार्ले (पूर्व), मुंबई, ४०० ०५७.

दूरभाषा : २६१६९२३४/९१५१

श्री. शिवराम घाटे,

पितळेवाडी, हनुमान मार्ग,

विलेपार्ले (पू), मुंबई ४०० ०५७.

दूरभाषा : २६१७१९९०

 

ठाणे

श्री. दि. प. वैद्य,

“भागीरथी” सावरकर मार्ग,

ठाणे (प), ठाणे ४०० ६०८

दूरभाषा :- २५३४२७५३

 

डोंबिवली

श्री. शरद शं. पटवर्धन,

बी- १-३ मातृआशिष सोसायटी,

ताई पितळे चौक, आचार्य तुळशी मार्ग,

डोंबिवली (पू) ४२१००१

दूरभाषा :- (९५२५१) २४४२९५१

श्री. भालचंद्र र. फाटक,

निर्मला सदन, गोपाल नगर,

गल्ली क्र. १, व संत नामदेव पथ,

डोंबिवली (पू) ४२१२०१

दूरभाषा : (९५२५१) २४५३१७३.

श्री. नरेंद्र दांडेकर,

बी-५, विजयनगर,

रिझर्व बँक सोसायटी ,

जुनी डोंबिवली (प) ४२१२०२.

दूरभाषा : (९५२५१) २४६१०२०.

 

इगतपुरी

श्री विनायक कृ. महाजन, गीता नगर, तळेगाव रोड, इगतपुरी ४२२२०३. जिल्हा नाशिक. दूरभाषा :- (९५२५५३) २४४४९४.

 

देवबांध

वसंत साठे, केंद्र व्यवस्था प्रमुख

सह्याद्रि अदिवासी बहुविध सेवा संघ

देवबांध केंद्र, ग्राम नाशेरा, पो. खोडाळा, ता. मोखाडा. जि. ठाणे. ४०१६०३

दूरभाषा :- खोडाळा वस्तीगृह :- (९५२५२९) २५००१०

 • डॉ. अशोक गजानन मोडक, अध्यक्ष
 • विनायक वसंत दीक्षित, उपाध्यक्ष
 • सुरेंद्र हरिश्चंद्र श्रृंगी, उपाध्यक्ष
 • अशोक माधव वझे, चिटणीस
 • शरद शंकर पटवर्धन, सहचिटणीस
 • जयराम शंकर हडळ, कार्यकारिणी सदस्य
 • नवसू ढवळू वळवी, केंद्र प्रमुख
 • भालचंद्र रघुनाथ फाटक, विश्वस्त
 • विनायक कृष्णराव महाजन, विश्वस्त
 • शिवराम केशव घाटे, विश्वस्त
MarathiMati.com - Android App on Google Play Store

MarathiMati.com - Android App on Google Play Store

मराठी कविता

नुसताच प्रवास गांडुगिरीचा

लाटाच लाटा
आणि समुद्र टिंगल करतोय
येडझव्या प्रवाशांची
तू ही रे! तू ही रे! गाण्यावर
मुले हिंदकळताहेत
लॉंचच्या तोंडाशी
वर खाली उभे आडवी
एक लाट येते
मी ओक ओक ओकतोय
रात्रीच्य भर समुद्रात
आदल्या रात्रीचं अजीर्ण संमेलन.

Nashik Diary - Nashik City Explorer